Jitendra Awhad Controversy: जितेंद्र आव्हाडांवरील आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कंबर कसली, जयंत पाटलांसह अजित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

आव्हाडांवरील या आरोपानंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील आता कंबर कसली आहे.

आज भल्या सकालपासूनचं राज्याचं राजकारण (Maharashtra Politics) चांगलचं तापलं आहे. कारण भल्या सकाळीच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट (Tweet) करत मी राजीनामा (Resignation) देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे. आव्हाड म्हणाले, पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासात 2 खोटे गुन्हे दाखल केला आणि तोही 354 म्हणजेचं विनभंगचा .मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. लोकशाहीची (Democracy) हत्या मी उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत अशा आशयाचं ट्वीट (Tweet) करत मी माझ्या आमदारकीचा राजीनामा (Resignation) देण्याचा निर्णय घेतो आहे, असं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. विनभंगाचा गुन्हा दाखल केल्याने जितेंद्र आव्हाड यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

 

तर आव्हाडांवरील या आरोपानंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Opposition Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील आता कंबर कसली आहे. अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद (Press Conference) घेतली असुन जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राजीनामा (Resignation) देऊ नये अशी विनंती केली आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील सरकारकडून पोलिसांचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप करत सध्या राज्यात गलिच्छ प्रकार सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. (हे ही वाचा:- Jitendra Awhad Resignation: जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय, ट्वीट करत केला खळबळजनक खुलासा)

 

आव्हाड यांनी हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाविरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जातायेत. पण शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्यांविरोधात आमचा लढा सुरु राहिल. आव्हाडांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचा (NCP) पाठिंबा आहे, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी जयंत पाटलांनी केली आहे.