Jitendra Awhad On Sanjay Raut & Sharad Pawar Viral Photo: संजय राऊतांना जितेंद्र आव्हाडांकडून नमन, पवारांना खूर्ची नेऊन दिल्याने राऊतांवर टीका करणाऱ्यांवर आव्हाड संतापले
जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
नवी दिल्लीत (Navi Delhi) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोवरुन काही लोकांनी संजय राऊतांवर टोलेबाजी केली होती. यावर आज संजय राऊतांनी संतापही व्यक्त केला. दरम्यान राष्टवादीचे काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीदेखील टीका करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली असून संजय राऊतांचं कौतुक केलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. आदरातिथ्य नावाची काही गोष्ट आहे की नाही? अशी विचारणा त्यांनी टीकाकारांना केली आहे.
काय म्हणाले जिंतेद्र आव्हाड
शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खुर्ची देण्याचा विचार करेल. जेव्हा आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभं राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे. तो काय आहे, कोण आहे हेदेखील आपण पाहत नाही. वयोवृद्ध व्यक्ती आली आणि आपल्याला जर त्यांना काय अडचणी आहेत माहिती असेल तर ते करतोच. संजय राऊत यांनी तसं केलं असेल तर त्यांच्यातील माणुसकीचे संस्कार दिसलेत. त्याच्याबद्दल एवढी चर्चा कशासाठी? हे महाराष्ट्रात काय सुरु आहे? महाराष्ट्र कशासाठी ओळखला जातो…आदरातिथ्य नावाची काही गोष्ट आहे की नाही? असे जिंतेद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. (हे ही वाचा Sanjay Raut met Priyanka Gandhi: राहुल भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रियंका गांधी यांच्यात खलबतं; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा.
Tweet
पुढे म्हणतात, “मुख्यमंत्री आल्यानंतर कितीही मोठा मंत्री असला तरी तो उठून उभा राहतो. हा त्या मुख्यमंत्रीपदाचा आदर आहे. शरद पवार या व्यक्तिमत्वाबद्दल, वयाबद्दल, त्यांच्या शारिरीक अस्वस्थेबद्दल ज्यांना माहिती आहे त्यातील संजय राऊत आहेत. त्यांनी तात्काळ खुर्ची आणली आणि दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि नमन करतो,” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.