दहिसर मध्ये सराफा दुकानावर डल्ला मारत भरदिवसा ज्वेलर्सची गोळ्या झाडून हत्या
यामध्ये तो जागीच ठार झाला. त्यानंतर 2 बॅगा भरून सोनं त्यांनी भरून दुकानातून पळ काढला.
दहिसर पूर्व परिसरात आज (30 जून) सकाळी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. दरम्यान एका सोने व्यापाराची 3 लूटारूंकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दहिसर येथील त्यांच्या दुकानातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. Om Sairaj Jewellery असं दुकानाचं नाव नाव असून दहिसर पूर्व येथे गावडे नगर Gavde Nagar) परिसरात आहे. हा प्रकार सकाळी 10 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास घडला आहे.
लुटारूंनी दुकान मालकावर गोळ्यांचा एक राऊंड झाडला. यामध्ये तो जागीच ठार झाला. त्यानंतर 2 बॅगा भरून सोनं त्यांनी भरून दुकानातून पळ काढला. दहिसर पोलिसांच्या माहितीनुसार, हे चोर बाईल वरून आले होते. ते सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. परंतू बाईकची नंबर प्लेट झाकलेली होती. कुणीच त्याचा नंबर रजिस्टर करू शकले नाही. सध्या सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा ठाव ठिकाणा लावण्याचं काम सुरू आहे.
दहिसर पोलिस स्टेशनच्या ऑफिसरने HT सोबत दिलेल्या प्रतिक्रिये मध्ये त्यांनी सांगितले की सध्या सार्या रस्त्यांच्या एक्झिटवर चेक पोस्ट उभारले आहेत. खबरींना देखील या प्रकाराची माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडून मदत घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
मीडीया रिपोर्ट्स नुसार, सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अॅक्टिव्हा वर 3 जण आले होते. बाईक चालवणारा युवक सफेद शर्ट आणि निळी जिन्स, तर दुसरा निळा शर्ट घातलेला दिसला आहे.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने ते पोहचले असून सध्या घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.