Coronavirus च्या पार्श्वभूमीवर जेजुरी येथे सोमवती अमावस्येला होणारी खंडोबा यात्रा रद्द

त्यातच जेजुरीच्या (Jejuri) खंडोबा मंदिराच्या संस्थानाने देखील एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 28 मार्चला जेजुरीत होणारी खंडोबा यात्रा रद्द करण्याचा निर्णय या संस्थानाकडून घेण्यात आला आहे.

खंडोबा (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला असून या व्हायरसने अनेक लोकांचे प्राण घेतले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासन तसेच डॉक्टरांकडून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या गुढीपाडव्याला मुंबईत ठिकठिकाणी होणारी शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यातच जेजुरीच्या (Jejuri) खंडोबा मंदिराच्या संस्थानाने देखील एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 28 मार्चला जेजुरीत होणारी खंडोबा यात्रा रद्द करण्याचा निर्णय या संस्थानाकडून घेण्यात आला आहे.

सालाबादप्रमाणे यंदाही सोमवती अमावस्येला खंडोबा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जेजुरीत येत्या 28 मार्चला ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना व्हायरससारखे भयाण संकट समोर असताना खबरदारी म्हणून ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मुंबई: Coronavirus मुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रभादेवी च्या सिद्धीविनायक मंदिरात देण्यात येणार 'या' विशेष सुविधा, आदेश बांदेकरांनी दिली माहिती

आज सकाळी झालेल्या ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला. 23 मार्चला सोमवती अमावस्या आली आहे. मात्र सूर्योदयानंतर दुस-या प्रहरात अमावस्येला प्रारंभ होत असल्याने पालखी सोहळा होणार नाही.

खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळानेही कोरोनामुळे ही यात्रा रद्द करावी अशी सूचना दिली होती. यामुळे सोमवती अमावस्येला निघणारी खंडोबाची पालखी आणि यात्रा होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

गुढी पाडवा (Gudhi Padwa) निमित्त हिंदू नवं वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या स्तरावर शोभायात्रांचे आयोजन करण्यात येते, यापैकी ठाणे शहर आणि डोंबिवली मधील शोभायात्रा या मागील 21 वर्षांपासून सलग आयोजित करण्यात येतात, मात्र यंदा या परंपरेला कोरोना व्हायरसच्या (Corona Virus)  जागतिक संकटामुळे ब्रेक लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहान करण्यात आले असता, आता ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी गुढी पाडवा स्वागत यात्रा यंदासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.