Amit Shah यांच्यासोबत भेट? जयंत पाटील म्हणाले 'मी कोठेच गेलो नाही'
त्यावर राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या. सोशल मीडियात अनेकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah)आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात भेट झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. त्यावर राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या. सोशल मीडियात अनेकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली. काहींनी तर या वृत्ताचे वर्णन शरद पवार यांना जोरदार धक्का, अशा प्रकारे केले. दरम्यान, दस्तुरखुद्द जयंत पाटील यांनीची प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या वृत्ताचे खंडण केले. मी कोठेही गेलो नाही. कालही आणि आजही पवार साहेबांसोबतच आहे, असे सांगितले.
अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत प्रसारमाध्यमांतून वृत्त येत आहे. राजकीय वर्तुळातही तशी चर्चा सुरु आहे, असे प्रसारमाध्यमांनी विचारल असता. जयंत पाटील यांनी कानावर हात ठेवत मी अशा प्रकारचे विधान किंवा माहिती कोठेच दिली नाही. त्यामुळे तुम्ही जर असे वृत्त दिले असेल आणि जनतेच्या मनात गैरसमज निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तरही तुम्हीच द्यायचे आहे. मी तर असे काहीच म्हटलो नव्हतो, असे पाटील यांनी म्हटले.
ट्विट
जयत पाटील यांनी अमित शाह यांची एक गुप्त भेट घेतली, असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांतून सुरु होती. यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले प्रसारमाध्यमांतून जनतेच्या मनात एकाद्याबद्दल गैरसमज, संभ्रम निर्माण करण्याचे उद्योग योग्य नाही. त्यामुळे बातमी देण्यापूर्वी बातमी देणाऱ्याने आगोदर अभ्यास करायला हवा. महाराष्ट्रातील जनतेला माझ्याबद्दल माहिती आहे. त्यामुळे आपल्या वृत्तामुळे माझी करमणूक होते. लोक बातम्या देतात मी इकडे गेलो, तिकडे गेलो. पण तुम्हाला सांगू इच्छितो की, मी आणि आमच्या पक्षाचे नेते अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल बुसारा रात्री दीड वाजेपर्यंत इथे (मुंबई) बसलो होतो. सकाळी शरद काल सकाळी आणि संध्याकाळी शरद पवार यांच्याकडे होतो. मग तुम्ही सांगता तिकडे कधी गेलो? याचे संशोधन झाले पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.