IPL Auction 2025 Live

Jayakwadi Dam Water Storage: जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी घटली, उरला फक्त एवढाच पाणीसाठा?

तर, दुसरीकडे उजव्या कालव्यात 900 क्युसेक आणि डाव्या कालव्यात 1200 क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Jyakwadi Dam

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Rain)जोरदार हजेरी लावली होती. नाशिक (Nashik) जिल्ह्यात झालेल्या जोरदार पाऊस आणि जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु झाली होती. त्यामुळे पाणीसाठ्यात देखील वाढ होताना पाहायला मिळत होती. मात्र, पुन्हा पावसाने दडी मरल्याने धरणाच्या पाणी साठ्यात पुन्हा एकदा घट होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात सुरु असेलेली जायकवाडी धरणातील पाण्याची आवक देखील यामुळे आता बंद झाली आहे.  (हेही वाचा - Gujarat Railway Services Disrupted: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार! रेल्वे सेवा विस्कळीत)

आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणात सध्या पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. तर, दुसरीकडे उजव्या कालव्यात 900 क्युसेक आणि डाव्या कालव्यात 1200 क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात ऑगस्ट महिना कोरडा गेला. त्यामुळे यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. अनेक भागात सध्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, अशा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच आता सप्टेंबर महिना अर्धा संपला आहे. त्यामुळे पावसाचे अंदाज 20 दिवस उरले आहेत. अशात जर जोरदार पाऊस झाला नाही, तर प्रश्न अधिकच गंभीर बनण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील शेतीला देखील जायकवाडी धरणातून पाणी सोडले जाते. मात्र, सध्या जायकवाडी धरणात फक्त 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  तसेच नाशिक जिल्ह्यात देखील यंदा जोरदार असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुढील 15 ते 20 दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो.