Jawan Suicide: भारतीय सैन्य दलातील जवानाने राहत्या खोलीत गळफास घेऊन केली आत्महत्या, परभणीत शोककळा
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Jawan Suicide: भारतीय सैन्य दलातील एका जवानाने राजस्थानमध्ये गळफास  (Suicide) घेऊन आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवले आहे. या धक्कादायक घटनेने राजस्थानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी 21 फेब्रुवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. नवनाथ सोंड (वय वर्ष 32) असं मृत तरुणाचे नाव आहे. नवनाथने आत्महत्या करून जीवन का संपवले हे अद्याप समजले नाही. (हेही वाचा- नवी मुंबईत परीक्षेच्या दिवशी 12वीचा विद्यार्थी बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ हा महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रहिवासी होता. आज नवनाथ यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पालम येथे आणण्यात येणार आहे.नवनाथ यांचे वडिल नसल्याने त्यांच्या आईने मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने नवनाथ यांना शिकवून सैन्यात भरती केले होते. रक्ताचे पाणी करत नवनाथ यांनी सैन्यात नोकरी मिळवली. परिस्थिती हालाकीचा असताना देखील त्यांनी लढाई थांबवली नव्हती.

राजस्थानपूर्वी  त्यानी मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, जम्मू काश्मीर अश्या ठिकाणी कर्तव्य बजावली. बुधवारी राजस्थानमधील राहत्या खोलीत त्यांनी गळफास घेतले.  त्यांच्या पश्चात पत्नी आणि त्यांची तीन मुली, आई, भाऊ, भावजाय असा परिवार आहे. नवनाथ यांनी आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबियांवर दुखांचा डोंगर कोसळला. पालम गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली. गावात शोककळा पसरली आहे. नवनाथ यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी आणण्यात येणार आहे.  दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये कर्तव्यवर असताना पोलिस निरिक्षकांने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.