मुंबई: कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन; वयाच्या 87 वर्षी घेतला अखेरचा श्वास; 17 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आज सांगली (Sangali) मध्ये संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या शिवप्रतिष्ठान (Shiv Pratishthan) तर्फे बंदाची हाक देण्यात आली आहे. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा सांगली दौरा देखील नियोजित आहे.

18 Jan, 03:26 (IST)

भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले आहे. नाडकर्णी हे ८७ वर्षांचे होते. नाडकर्णी हे त्यांची पत्नी, मुलगी, जावई, नातू यांच्यासह पवई येथील हिरानंदानी गार्डन येथे मुलीकडे राहत होते. तिथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

 

18 Jan, 03:16 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून साई जन्मभूमीवरील वादाने अधिक पेट घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्याजवळील पाथरीला साईंचे जन्मस्थान म्हणून संबोधित केल्याने शिर्डीतील लोक संतप्त झाले आहेत. यामुळे शिर्डीतील नागरिकांनी 19 जानेवारीपासून अनिश्चित बंदची घोषणा केली आहे. 

 

18 Jan, 02:05 (IST)

'न्यू इंडियन कॉन्स्टिट्यूशन' या नावाने एक 'पीडीएफ बुकलेट' सध्या ऑनलाईन शेअर होत आहे.  मोहन भागवत यांनी ते बनवले असल्याचा खोटा प्रचार होत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

18 Jan, 01:15 (IST)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने दिसून येत असल्याने आता मनसे मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वावर जास्त भर देणार असे दिसून येते. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नुकतंच हे पोस्टर ट्विट केलं आहे, ज्यात 'विचार महाराष्ट्र धर्माचा ! निर्धार हिंदवी स्वराज्याचा !' असं एक ब्रीदवाक्य लिहिलं आहे.

18 Jan, 24:56 (IST)

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं मत मांडलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना या संबंधित माहिती दिली आहे. शरद पवार म्हणाले, “संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यापासून मला दूर ठेवा.  मला त्या वादात पडायचं नाही. परंतु, इंदिरा गांधींबद्दल त्यांनी असं बोलायला नको होतं.”

18 Jan, 24:17 (IST)

आज भाजपचे बडे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. परंतु, प्रसाद लाड यांनी अजित पवारांची आज नेमकी कोणत्या कारणासाठी भेट घेतली हे अद्याप कळलेलं नाही.

17 Jan, 23:34 (IST)

गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे-मुंबई हायपरलूपबाबत चर्चा सुरु आहे. मात्र सध्या तरी ही हायपरलूप नको असल्याचे संकेत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘हायपरलूप आजपर्यंत जगात कुठेही बांधले गेलेले नाही, म्हणून इथल्याआधी दुसरीकडे कुठे त्याची सुरुवात होऊ दे. एकदा ते यशस्वी झाल्यावर आपण इथेही त्याबद्दल विचार करूया.’

17 Jan, 22:22 (IST)

दिल्ली: निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींची फाशी पुढे ढकलण्यात आली असून आता 22 जानेवारी ऐवजी 1 फेब्रुवारी रोजी  सकाळी ६ वाजता त्यांना तिहार जेल येथे मृत्युदंड दिला जाईल. आज दोषी मुकेश सिंह याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यांनंतर दिल्ली उच्च न्यायलायकडून हा निर्णय देण्यात आला आहे.

17 Jan, 22:04 (IST)

डॉ. बॉम्ब उर्फ कुख्यात दहशतवादी  जलील अन्सारी याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. 1993 सहित 50 बॉम्बस्फोटात नाव जोडलेल्या अन्सारी याला अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तूर्तास 21 दिवसांच्या पॅरोलवर असताना काल 16 जानेवारी पासून ते बेपत्ता होते.

 

17 Jan, 21:12 (IST)

बीड विधानपरिषद रिक्त जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे, दौंड यांच्या विरुद्ध असणाऱ्या भाजपच्या राजन तेली यांनी अगदी ऐनवेळी संख्याबळ नसल्याने आपला अर्ज मागे घेतला त्यामुळे दौंड यांचा मार्ग मोकळा झाल्याचे समजत आहे. 

 

17 Jan, 20:55 (IST)

सीमा लढ्यातील शहिद हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथील हुतात्मा चौकात गेलेल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दुपारी कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. राजकीय व्यक्तींनी याठिकाणी येऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त केला असताना लपून राजेंद्र पाटील याठिकाणी दाखल झाले होते, ही बाब समोर येताच पोलीसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली व हा वाद वाढत जाऊन अखेरीस कर्नाटक पोलिसांनी त्यांना अटक केली. 

 

17 Jan, 19:38 (IST)

अकोला जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार ऐनवेळी राजकारणाला कलाटणी मिळून भाजप महाविकासआघाडीसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

17 Jan, 19:35 (IST)

शिवसेना भवनासमोर ‘राज ठाकरे महाराष्ट्र धर्म सम्राट’ असे पोस्टर झळकल्याे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची येत्या 23 जानेवारी या दिवशी जयंती आहे. या जयंतीदिनीच  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कार्यकर्ता मेळाव्याच आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर हे पोस्ट झळकल्याचे बोलले जात आहे.

17 Jan, 17:50 (IST)

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेश याची दया याचिका आज गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आली होती.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या प्रकरणी तातडीने निर्णय देत ही याचिका फेटाळून लावली आहे. या चारही दोषींना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार होती, मात्र या प्रक्रियेमुळे फाशी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  

 

17 Jan, 17:47 (IST)

सरकार गेल्यानंतरही भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, जयदत्त क्षीरसागर यांनी शासकीय बंगले रिकामे केले नसल्याने त्यांना नोटीस धाडण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. 

 

17 Jan, 16:59 (IST)

महात्मा गांधी यांना भारतरत्न देण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. हा निर्णय देताना महात्मा गांधी हे स्वतः भारतरत्न पेक्षा सर्वश्रेष्ठ आहे असेही मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

17 Jan, 16:45 (IST)

अप्पर वैतरणा जलवाहिनीच्या कामामुळे उद्या (18 जानेवारी) आणि रविवारी (19 जानेवारी) रोजी धारावी आणि वांद्रे मधील काही भागात पाणी पुरवठा बंद असणार आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक तजवीज करून ठेवावी. 

 

17 Jan, 16:31 (IST)

साईबाबांचा जन्म नेमका पाथरी येथे झाला की शिर्डीत? हा वाद काही दिवसांपासून अधिकच तीव्र होत असल्याने रविवार 19 जानेवारी पासून बेमुदत काळासाठी शिर्डी बंद ठेवण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

17 Jan, 16:21 (IST)

केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेश यांची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे आज पाठवली आहे. गृहमंत्रालयाने पाठवलेल्या दयायाचिकेवर राष्ट्रपती काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. न्यायायालयाने  प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली असून, शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी 22 जानेवारी हा दिवस निश्चीत करण्यात आला आहे. तत्पूर्वी आरोपींनी दया याचिका दाखल केल्यामुळे फाशीच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार याबाबत उत्सुकता आहे. 

17 Jan, 15:39 (IST)

पुण्यातील घोरपडी येथे भीमनगर परिसरात राहणाऱ्या तानाजी गणपत कोरके (वय 60) यांनी डीएसके कडे केलेली गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याने आज आत्महत्या केल्याचे समजत आहे, आपल्या चौथ्या मुलीच्या लग्नासाठी  त्यांना पैशांची गरज होती मात्र कित्येकदा पाठपुरावा करूनही पैसे पुन्हा मिळत नसल्याने हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले होते. 

 

Read more


शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut)  यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)  यांच्यावर आपले टीकास्त्र सोडून शिवछत्रपतींचे वारस असल्याचा पुरावा घेऊन या असे विधान केले होते, ज्यांनंतर उदयनराजेंच्या समर्थकांकडून सातारा बंद करण्यात आला होता तर आज सांगली (Sangali)  मध्ये सुद्धा संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या शिवप्रतिष्ठान (Shiv Pratishthan)  तर्फे बंदाची हाक देण्यात आली आहे. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांचा सांगली दौरा देखील नियोजित आहे.

संभाजी भिडे यांनी संजय राऊत यांना पदावरुन हटवावे, अन्यथा हे बंद यापुढेही कायम राहील असा इशाराही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यावर मुख्यमंत्र्यांचे मत अजूनही समोर आलेले नाही.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दुसरीकडे, मुंबईत आज थंडीने मागील कित्येक वर्षातील रेकॉर्ड मोडून काढत तब्बल 11. 4 अंशावर घसरण केली आहे. अशातच उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे पुढील काही दिवस तापमानाचा पारा कमी होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. सांताक्रूझ येथे आज सकाळी 11.4  अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथील तापमान 14.5 अंश होते. गेल्या दहा वर्षांत 2013  या दोन वर्षांत इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती. तर नाशिक, निफाड येथे तापमान घसरून 2.4 अंशावर उतरले आहे. समान परिस्थिती राज्यभरात पाहायला मिळत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now