Jalgaon: तरुणीचा दबाव, तरुणाची आत्महत्या, लग्नासाठी तगादा लावल्याने टोकाचे पाऊल
हा तरुण जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील उचंदा गावातील आहे. अजय सीताराम इंगळे (वय 25) असे या तरुणाचे नाव आहे. तरुणीच्या तगाद्याला कंटाळून त्याने आत्महत्या (Suicide) केली आहे.
Love Affair Relationshi: लग्नासाठी तरुणीने लावलेला तगादा एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. हा तरुण जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील उचंदा गावातील आहे. अजय सीताराम इंगळे (वय 25) असे या तरुणाचे नाव आहे. तरुणीच्या तगाद्याला कंटाळून त्याने आत्महत्या (Suicide) केली आहे. तरुण वयात इतके टोकाचे पाऊल उचलल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप एका तरुणीवर होत आहे.
अजय सीताराम इंगळे हा आपल्या कुटुंबीयांसह मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे राहतो. त्याचे कुटुंबीय याच गावचे रहीवासी आहेत. दरम्यान, गावातीलच एक तरुणी त्याला लग्न कर म्हणून सातत्याने दबाव टाकत होती. ही तरुणी 28 वर्षांची असून तीने अजयकडे लग्नासाठी सतत्याने तगादा लावला होता. अजय मात्र तिचा दबाव सातत्याने फेटाळून लावत लग्नास नकार देत असे. तरीही ही तरुणी लग्नासाठी सातत्याने लकडा लावत असल्याने त्या मानसिक त्रास होत असे. परिणामी वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून अजयने मंगळवारी (8फेब्रुवारी) दुपारी खामखेडा पूल येथील पूर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. (हेही वाचा, पतीच्या निधनानंतर अवघ्या 8 दिवसांत मुलीची हत्या करुन पत्नीची आत्महत्या; वर्धा येथील घटना)
अजयचा भाऊ मनोज इंगळे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली असून, आपल्या भावाला संबंधित तरुणीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. अजयच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन तरुण्यात घरातील मुलगा गेल्याने इंगळे कुटुंबीय दु:खात आहेत. परिसरातही हळहळ व्यक्त होते आहे.