Jalgaon Rape Case: सहा वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या; संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला; जळगाव जिल्ह्यातील घटना

नराधमाची क्रूरता इतकी की, त्याने बलात्काराचे कृत्य केल्यावर तिची हत्या (Murder) केली. ही घटना चिंचखेडा शिवारात घडली. घटनेनंतर समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Stop Rape (Representative image)

जळगाव (Jalgaon Shocker) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार (Rape) करण्यात आला आहे. नराधमाची क्रूरता इतकी की, त्याने बलात्काराचे कृत्य केल्यावर तिची हत्या (Murder) केली. ही घटना चिंचखेडा शिवारात घडली. घटनेनंतर समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी आक्रमक होत पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. आक्रमक जमावाकडून पोलिसांकडे आरोपीला आमच्या ताब्यत द्या अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी लागलीच आरोपीला सुरक्षीत ठिकाणी हलवले. मात्र, प्रक्षुब्द जमावाने या वेळी पोलिसांवरही हल्ला केला. या हल्ल्यात 12 पोलीस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे जखमी झाल्याचे वृत्त आहे.

संतप्त जमावाने रस्त्यावर जाळले टायर

चिमुकलीवर आत्याचार केल्यानंतर आरोपीने तिची हत्या करुन घटनास्थळावरुन पलायन केले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला भुसावळ येथून गुरुवारी (20 जून) ताब्यात घेतले आणि अटक केली. सुभाष इमाजी भिल ( वय ३५, रा. वावडदा, ह.मु. चिंचखेडा, ता. जामनेर ) असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपीने ककेत निंभोरा येथील एका चिमुकलीवर बलात्कार केला. आरोपीची क्रूरता पाहून परिसरात प्रचंड प्रमाणावर संताप निर्माण झाला. नागरिक रस्त्यावर उतरले. आरोपीच्या निशेधार्त जमावाने रस्त्यावर टायरही जाळले. तसेच, काही काळ महामार्गही रोखून धरला. या घटनेमुळे जामनेर शहर काही काळ ठप्प झाले होते. (हेही वाचा, Hyderabad Horror: पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन असलेल्या बापाची पोटच्या मुलीवर सेक्सची जबरदस्ती; नकार दिल्याने केली हत्या)

आरोपीस पोलिसांकडन अटक

दरम्यान, पोलिसांनी सतप्त जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र, बराच काळ त्याला यश येत नव्हते.  जळगाव पोलिसांनी अनेकदा अवाहन केल्यानंतर जमाव अखेर शांत झाला. मात्र, खदखद कायम होती. दरम्यान, फरार आरोपीला पोलिसांनी भुसावळ तालुक्यातील तापी नदीजवळील भील वस्तीवरुन ताब्यात घेतले. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याचे समजताच जमाव पुन्हा एकवटला. जमावाने पोलीस स्टेशनकडे धाव घेत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. (हेही वाचा, Murder Video: लग्नास नकार दिल्याने महिलेची भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या; मोहालीतील धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल (Watch))

प्राप्त माहितीनुसार, जमाव इतका प्रक्षुब्ध झाला होता की, पोलिसांना दंगल नियंत्रण पथक पाचारण करावे लागले. परिसरात दंगलसदृश्य वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीमारही सुरु केला. त्यामुळे परिस्थिती आणखीच बदलली. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डीवायएसपी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थीती नियंत्रणा आणण्यासाठी अधिक प्रयत्न केले आणि जमाव शांत झाला. या वेळी झालेल्या हल्ल्यात पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी हितेश महाजन, कुंभार, सुनील राठोड, आर. एस.कुमावत, संजय खंडारे, प्रीतम बारकले यांच्यासह आणखी काही कर्मचारी जखमी झाले. जखमी पोलिसांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.