Jalgaon Municipal Corporation Election 2021 Result: जळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक, कोण मारणार बाजी? ऑनलाईन पद्धतीने होणरा मतदान; भाजपची प्रतिष्ठा पणाला
भाजपचे काही नगरसेवक हे शिवसेनेच्या गळाला लागल्याचं लक्षात घेत भाजपने हे सावध पावले उचलीत उर्वरित काही नगरसेवकांना नाशिकमध्ये अज्ञात स्थळी सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले असून हे नगरसेवक नाशिकमधील अज्ञात स्थळावरून मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.
जळगव महानगरपालिका (Jalgaon Municipal Corporation) महापौर, उपमहापौर पदासाठी आज ऑनलईन पद्धतीने निवडणूक (Jalgaon Municipal Corporation Mayor Election) पार पडत आहे. ऑनलाईन मतदान (Online Voting) होणार असल्याने नगरसेवकांना प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. गटतट, डावपेच, रुसवे फुगवे, फोडाफोडी आदींमुळे आगोदरच चर्चेत आलेल्या या निवडणुकीत ऑनलाईन मतदान पद्धतीने अधिकच रंगत आणली आहे. जळगाव पालिकेवर भाजपची सत्ता आहे. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. तगडे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडला आहे. दुसऱ्या बाजूला भाजपवर नाराज असलेला नगरसेवकांचा एक गट शिवसेनेसोबत गेल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही निवडणू पार पडत असल्याने उत्सुकता वाढली नाही तरच नवल.
नाराज नगरसेवकांन पुन्हा बाजपच्या बाजूने वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. तसे संकेत मिळताच शिवसेनेसोबत असलेल्या भाजप नगरसेवकाचा गट मुंबईच्या सहलीवर असल्याचे सांगण्यात येते आहे. आता अशीही चर्चा आहे की नगरसेवकांचा हा गट आता ठाणे येथूनच मतदान करणार आहे. अर्थात या सर्व शक्यता आणि चर्चा आहेत. यातील वास्तवता प्रत्यक्ष मतदानावेळी आणि निकालानंतरच बाहेर येणार आहे. दरम्यान, जळगाव महापालिका महपौर पदासाठी शिवसेना पक्षाकडून जयश्री महाजन आणि उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचा अर्ज दाखल झाला आहे. (हेही वाचा, जळगावात भाजपला मोठा धक्का; 57 पैकी 30 नगरसेवक शिवसेनेत दाखल)
दुसरीकडे भाजपचे काही नगरसेवक हे शिवसेनेच्या गळाला लागल्याचं लक्षात घेत भाजपने हे सावध पावले उचलीत उर्वरित काही नगरसेवकांना नाशिकमध्ये अज्ञात स्थळी सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले असून हे नगरसेवक नाशिकमधील अज्ञात स्थळावरून मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.
राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जळगाव महापौर, उपमहापौर पदासाठीची निवडणूक ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयास भाजपने न्यायालयात आव्हान दिले. परंतू कोरोना संकट गंभीर असल्याचे सांगत न्यायालने ही निवडणूक ऑनलाईनच घ्यावी असे सांगितले आणि मग भाजपचा नाईलाज झाला. आता न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक ऑनलाईन पद्धतीने पार पडते आहे. त्यामुळे नगरसेवग विविध ठिकाणांहून (ज्या ठिकाणी असतील तेथून ) मतदान करणार आहेत.
दरम्यान, जळगाव महापालिकेत सांगली पॅटर्न पाहायला मिळण्याची शक्यात वर्तवली जात आहे. जळगाव महापालिकेवरही भाजपची सत्ता होती. मात्र, जयंत पाटील यांनी केलेल्या खेळीमुळे भाजपला सांगली महापालिकेतील सत्ता गमवावी लागली. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी आगोदरच दावा केला आहे की, जळगाव महापालिकेत महापौर शिवसेना ठरवणार तर उपमहापौर पक्षाध्यक्षांच्या सहाय्याने मी स्वत: ठरवणार. त्यामुळे रंगत अधिक वाढली आहे. फैसला आज होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)