जळगाव येथील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून निराधार महिलेकडे शरीरसुखाची मागणी

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून एका निराधार महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

जळगाव येथील महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील दोन अधिकाऱ्यांकडून एका निराधार महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या आरोपी दोन अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी असे निवदेनच्या माध्यमातून म्हटले आहे.

पीडित महिला महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आहे. तसेच महिला निराधार असून तिच्याकडे दोन अधिकाऱ्यांनी शरीरसुखाची मागणी करत तिला त्रास देण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला. एवढेच नसून तिच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा आणि नोकरीतून दुसऱ्या ठिकाणी बदली करु अशा धमक्यासुद्धा देण्यात आल्या. (हेही वाचा-मुंबई: पाटलाग करुन तरुणीचे जबरदस्तीने चुंबन; आरोपीला अटक)

तर कार्यकर्त्यांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्याकडे दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन आरोपींना क्षमा नाही असे टेकाळे यांनी म्हटले आहे.