जळगाव मध्ये सोन्याच्या दरात ऐतिहासिक उसळी, 10 ग्रॅमचा दर पोहचला 34 हजाराच्या पार, 'हे' आहे कारण

जळगाव मध्ये मंगळवारी प्रति दहा ग्राम सोन्याचा दर सर्वात जास्त म्हणजे 34 हजार 700 रुपये इतका नोंदवण्यात आला, महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधील सोन्याचा दर सुद्धा जाणून घ्या

Gold Rates (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात जळगाव (Jalgaon) मध्ये मंगळवारी प्रति दहा ग्राम सोन्याचा भाव (Gold Rates) सर्वात जास्त म्हणजे 34 हजार 700 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे . सोन्याच्या व्यापाऱ्याने देशभरात घेतलेल्या या कमालीच्या उसळीमागे अमेरिका (America)  व इराण (Iran) या देशांमध्ये सुरु असणाऱ्या वादग्रस्त घटनांचे कारण सध्या समोर आलं आहे. दोन देशातील वादामुळे जागतिक स्तरावर व्यापारात मंदी जाणवत आहे, ज्यामुळे व्यापारी सुरक्षित गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत,

मागील आठवड्यात अमेरिका फेडरल रिजर्व्ह ने केलेल्या घोषणेनुसार 2019 मध्ये फेडरल ओपन मार्केट कमेटी (Federal Open Market Committee) च्या बैठकीत सोन्यावरील व्याजदर घटवण्याचा संकेत दिला होता, ज्यामुळे गुंतवणुकीसाठी या मूल्यवान धातूला व्यापारी पसंती दर्शवत आहेत, परिणामी दरवाढीला चालना मिळत आहे. Gold Purity Guide: Gold Coin, वळं, दागिने विकत घेण्यापूर्वी जाणून घ्या 24k, 22k आणि 18k सोन्यातला फरक

जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे सोन्याचे दर

मुंबई मध्ये प्रति दहा ग्राम 22 कॅरेट सोन्यासाठी 33 हजार 650 रुपये तर प्रति दहा ग्राम 24 कॅरेट साठी 35 हजार 989 रुपये इतके शुल्क आकारण्यात येत आहे. याशिवाय पुणे, नागपूर, नाशिक येथे प्रति दहा ग्राम 22 कॅरेट साठी 33 हजार 660 रुपये तर प्रति दहा ग्राम 24 कॅरेट साठी 34 हजार 660 रुपये इतका दर आहे.

दरम्यान ही दरवाढ येत्या काळात आणखीन उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका आणि इराणच्या संबंधांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरनवर देखील मागील काही दिवसात बारच परिणाम झाला होता त्यापाठोपाठ आता या वादाने सोने व्यापारावर सुद्धा प्रभाव टाकायला सुरवात केली आहे. या वादामुळे अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य घसरले होते.सोन्याचे भाव मागील सहा वर्षांपासून वाढत असले तरी केवळ व्याजदर कमी होण्याच्या आशेवर गुंतवणूकदार या धातूच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत.