Jalgaon Fake Ghost Videos: जळगाव मध्ये शिर नसलेलं धड, उलट्या पावलांनी चालणारी महिला असे खोटे व्हिडिओ बनवून नागरिकांमध्ये दहशत पसवणार्‍या तिघांना अटक

त्यानंतर पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेऊन पहूर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता संबंधित व्हिडीओ हा बनावट असल्याचं उघड झालं. स्वतः आरोपींनी त्याची कबुली दिली.

Arrested

सोशल मीडीयामध्ये ओळख लपवून लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार सर्रास केला जातो. जळगावातही (Jalgaon) तिघांनी मिळून रात्रीच्या अंधारात शिर नसलेलं धड फिरत असल्याचा, उलट्या पावलांनी महिला चालत असल्याचे व्हिडीओ वायरल केले आहेत. दरम्यान पोलिस तपासामध्ये हे व्हिडिओ खोटे असल्याचं समोर आले आहेत. याप्रकरणी आरोपींनी कबुली दिली असून पोलिसांनी तिघाही आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान जळगावमध्ये भूताचे व्हिडिओ वायरल केले जात आहे. जामनेर तालुक्यातील पहुर येथील हा प्रकार असून सोशल मीडीयात हे खोटे पाहून अनेकांच्या मनात दहशत बसली होती. आरोपींनी रात्रीच्या अंधारामध्ये रस्त्यावर एका कारमध्ये बसून व्हिडीओ शूट केला. यावेळी त्यांनी शिर नसलेला एक मुलगा आणि एक महिला उलट्या पावलांनी चालत असल्याचं दृश्य शूट केलं. यावेळी आरोपींनी कारचा डिप्पर लाईट लावत हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. या सगळ्या प्रकाराचा आपण साक्षीदार असल्याचं दाखवत आपली प्रतिक्रिया देखील रेकॉर्ड केली. आरोपींनी त्यानंतर सोशल मीडियावर पटाळ फाट्यावर भूत फिरत असल्याचं सांगत संबंधित व्हिडीओ शेअर केला. (नक्की वाचा: Ghost Story of Saffron BPO in Gurgaon: कब्रस्थान वर सुरू असलेल्या बीपीओ मध्ये काम करणार्‍या Rose ची गुढकथा) .

फत्तेपुर मध्ये काही सूज्ञ नागरिकांनी हे व्हिडिओ पाहून पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेऊन पहूर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता संबंधित व्हिडीओ हा बनावट असल्याचं उघड झालं. स्वतः आरोपींनी त्याची कबुली दिली.

जनतेमध्ये भीती निर्माण करण्यासाठी हा व्हिडीओ तयार केला आहे. त्यामुळे जनतेने घाबरुन जाऊ नये. भूत वगैरे ही केवळ काल्पनिक गोष्ट आहे तसेच अशाप्रकारचे व्हिडीओ व्हायरल करुन लोकांमध्ये भीती निर्माण करु नये. कुणीही तसा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते”, असा इशारा संजय बनसोड यांनी दिला आहे.