जळगाव: माजी महापौर अशोक सपकाळे यांंचा मुलगा राकेश सपकाळे चा निर्घुण खून

दरम्यान ही हत्या पूर्व वैमनस्यामधून झाली आहे. या घटनेने सारं जळगाव हादरलं आहे.

Image used for represenational purpose (File Photo)

जळगाव (Jalgaon)  मध्ये काल राकेश सपकाळे (Rakesh Sapkale)  या 28 वर्षीय मुलाच्या खुनाने खळबळ पसरली आहे. दरम्यान राकेश हा जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे (Ashok Sapkale) यांचा मुलगा आहे. जळगाव मधील शिवाजी नगर (Shivaji Nagar)  परिसरामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी रात्री अत्यंत निर्घुणपणे राकेश सपकाळे याची हत्या केली आहे. दरम्यान ही हत्या पूर्व वैमनस्यामधून झाली आहे. या घटनेने सारं जळगाव हादरलं आहे.

माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेशचे आणि त्याच्या भावाचे काही दिवसांपूर्वी जळगावातील शनी पेठ मधील काही तरूणांशी भांडण झाले होते. या भांडणातून काल राकेशचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राकेश काल (4 नोव्हेंबर) रात्री 11.30 च्या सुमारास स्मशानभूमी परिसराजवळून येत होता. तेव्हा त्यांच्यावर अज्ञातांनी लाथाबुक्कांनी मारहाण केली. नंतर धावत्या ट्रकसमोर त्याला फेकले. या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तसेच राकेशच्या अंगावर धारदार अस्त्राचे वार आहेत. या खूनानंतर राकेशच्या मारेकर्‍यांनी तेथून पळ काढला आहे. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिस स्टेशनमध्ये अधिक तपास सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये दिवसाढवळ्या खून झाला होता.  21 ऑक्टोबर दिवशी त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार (Dhananjay Tungar) यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif