Jalgaon Crime: आठ दिवसांच्या चिमुकलीचा बापाने केली हत्या, जळगाव येथील धक्कादायक घटना

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

Jalgaon Crime: जळगाव मधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका जन्मदात्या बापाने अवघ्या आठ दिवसांच्या मुलीची हत्या केली आहे. माहिती नुसार, दोन मुलींच्या पाठी तिसरीही मुलगीच झाल्याने वडिलांने मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केली आहे. या घटनेनंतर जलगाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. एकी कडे सरकार मुलींच्या शिक्षणाच्या योग्य ते योजना आखत आहे, तर एकी कडे मुलीचा जीव घेतला जात आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील जामनेर तालुक्यातील तांडान येथे ही घटना घडली. हे गाव पहूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच, आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे, गोकुळ गोटीराम जाधव असं या आरोपी व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांना दिलेल्या कबुलीत, दोन मुलींच्या पाठी तिसरी मुलगी झाल्याने आरोपीने हे कृत्य केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आठ दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखू कोंबली आणि तिला तंबाखूमुळे विषबाधा झाली. काही काळातच तीने झोपेत प्राण सोडले.

आरोपीला मिळालेल्या आधारावर पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीसांत आरोपीने गुन्हा कबुल केला. पोलीसांनी आरोपीवर हत्येचा आणि  आरोपीने पुरावे नष्ट केल्याने, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. पोलींसानी आरोपीला अटक केली.