IPL Auction 2025 Live

Jalgaon Cold: थंडीच्या कडाक्याने गारठून जळगाव येथे चौघांचा मृत्यू

थंडीत काकडून चार बेघरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. बेघर असल्याने या चौघांवरही थंडीच्या कडाक्यात रस्त्याच्या कडेला झोपण्याची वेळ आली होती.

Cold in Maharashtra | Temperature Maharashtra | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

थंडीच्या कडाक्याने जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात चार जणांचे प्राण घेतले आहे. थंडीत काकडून चार बेघरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. बेघर असल्याने या चौघांवरही थंडीच्या कडाक्यात रस्त्याच्या कडेला झोपण्याची वेळ आली होती. ज्या दिवशी हे चौघे रस्त्याच्या कडेला झोपले होते. त्या दिवशी जळगावमध्ये पारा साडेसात अंशापर्यंत घसरला (Jalgaon Cold) होता. अशा जीवघेण्या थंडीत उघड्यावर झोपने या चौघाच्याही जिवावर बेतले. एका बाजूला कडाक्याची थंडी आणि या थंडीतच बोचरा वेगवान वारा. त्यामुळे निवाऱ्याला राहणाऱ्या नागरिकांनाही चांगलीच धडकी भरते आहे. त्यामुळे बेघरांवरील स्थिती किती गंभीर असेल याची कल्पना करुनच नागरीक बैचेन झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, जळगावमध्ये थंडीत गारठल्याने मृत्यमुखी पडलेले चौघेही बेघर होते. त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधनही नव्हते. त्यामुळे हे चौघेही भीक मागून उदरनिर्वाह करत असत. या चौघांपैकी एकाचा मृतदेह पांडे डेअरी चौक येथे आढळून आला.दुसऱ्याचा निमखेडी रस्त्यावर तर एकाच मृतदेह रेल्वे स्टेशनवर आढळून आला. चौथ्या व्यक्तीचा मृतदेह जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीत आढळून आला. हे चौघे निपचीत पडून असल्याचे आढळून येताच नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत्यूपूर्वीच मृत घोषीत केले. प्रशासनाला या चौघाची नावे आणि ओळख समजू शकली नाही. (हेही वाचा, Cold Wave in Maharashtra: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; पुणे, नाशिक, नांदेड येथे पारा एकांकी संख्येवर घसरला, पाहा आजचे तापमान)

जळगावमधील हे चौघेही थंडीने गारठल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे. मात्र, शवविच्छेदनानंतर अधिक माहिती पुढे येईल असे डॉक्टरांनी म्हटले आहे. पाठिमागील काही दिवसांपासून राज्यातील तापमान सातत्याने घटतने आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत असून, नाशिक, जळगाव, धुळे येथील तापमान कमालीचे घसरत आहे. त्यामुळे निवारा नसलेल्या बेघरांचा प्रश्न सातत्याने समाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातो आहे.