Jalgaon Crime: जळगावमध्ये मोटारसायकलवर डोके आपटून तरुणाची हत्‍या

जुन्या भांडणावरून दोघांमध्ये आपसात वाद झाले. वाद विकोपाला गेल्याने मद्य सेवन करून आलेला संशयित आरोपी राहुल पाडाळे याने मंगल शेळके यांचे डोके मोटरसायकलवर आपटले.

Dead-pixabay

जळगाव भुसावळ (Bhusawal) तालुक्यातील फेकरी गावात एका धक्कादायक घटना घडली आहे. मंगल शांताराम शेळके व राहुल पाडाळे यांचा जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये मंगल शेळके यांचे मोटरसायकलवर डोके आपटल्याने जागीच मृत्‍यू झाला. संशयित आरोपीस रात्री ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. फेकरी उड्डाण पुलाजवळ साकरी गावाकडील सर्व्हिस रोडवर सदर घटना घडली. ( हेही वाचा - Pune Shocker: भोसरी परिसरात घरासमोर थांबलेल्या तरुणीला शिवीगाळ करून विनयभंग; आरोपी तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल)

जुन्या भांडणावरून दोघांमध्ये आपसात वाद झाले. वाद विकोपाला गेल्याने मद्य सेवन करून आलेला संशयित आरोपी राहुल पाडाळे याने मंगल शेळके यांचे डोके मोटरसायकलवर आपटले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तालुका पोलीस स्टेशनला आकाश शांताराम शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपीस शनिवारी रात्री साडेआठच्‍या सुमारास अटक करण्यात आली. आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनविली आहे. संशयित आरोपीने या आधीही मयत मंगल शेळके यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement