Jaipur-Mumbai Train Shooting Case: जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरणातील आरोपी RPF Constable Chetan Singh ला झटका; मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन नामंजूर

चौहानने 1 ऑगस्ट रोजी ट्रेनमध्ये गोळीबार केला होता. यात ट्रेनमधील चार जणांचा मृत्यू झाला होता.

RPF Constable CT Chetan Singh (Photo Credits: Twitter/ANI)

Jaipur-Mumbai Train Shooting Case: मुंबईतील सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) शनिवारी रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) कॉन्स्टेबल चेतनसिंग चौहान (RPF Constable Chetan Singh) यांना जामीन नाकारला. जयपूर-मुंबई ट्रेनमधील वरिष्ठ हवालदार आणि इतर प्रवाशांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चेतनसिंग चौहानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. चौहानने 1 ऑगस्ट रोजी ट्रेनमध्ये गोळीबार केला होता. यात ट्रेनमधील चार जणांचा मृत्यू झाला होता.

निलंबित केलेले रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) कॉन्स्टेबल चेतनसिंग चौधरी यांच्या जामीन याचिकेला फिर्यादीने विरोध केल्यानंतर एका आठवड्यानंतर ही घटना घडली आहे. त्यानंतर त्याची पत्नी प्रियंका हिने म्हटलं की, या घटनेकडे जातीय हिंसाचाराच्या संदर्भात न पाहता मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. (हेही वाचा - ट्रेनमध्ये गोळीबार प्रकरणी आरोपी Chetan Singh यास न्यायालयीन कोठडी)

4 जणांची हत्या केल्यानंतर चौधरीला अटक - 

31 जुलै रोजी चौधरी यांनी तीन प्रवासी आणि त्यांच्या वरिष्ठ सहकारीवर ट्रेनमध्ये गोळ्या झाडल्या. त्यानंतर चौधरीला अटक करण्यात आली होती. चौधरी तणावाखाली होता. काही वर्षांपासून तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता, असा दावा त्याचे कुटुंबीय करत आहेत. (हेही वाचा - Mumbai-Jaipur Superfast Express Firing incident मधील आरोपी Chetan Singh ला 7 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी)

दरम्यान, चौधरीला कोणताही मानसिक त्रास नसल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला होता. आरोपीने आधी त्याच्या वरिष्ठांवर गोळी झाडली. त्यानंतर त्याने शांत मनाने तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणार्‍या गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) चौधरीच्या जामीन अर्जाला विरोध केला असून  त्याला एका विशिष्ट समुदायाविरुद्ध 'राग आणि द्वेष' असल्याचे दिसून आल्याच म्हटलं आहे. आरोपीने आपल्या गुन्ह्याबद्दल कोणताही पश्चात्ताप व्यक्त केला नाही. जर त्याला जामीन मंजूर झाला तर ते कायद्याच्या राज्याबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण करू शकते. तथापी, काही धार्मिक गटांमध्ये भीती आणि असुरक्षितता निर्माण करू शकते, असंही जीआरपी पोलिसांनी म्हटलं आहे.