Marathi Artists Met Raj Thackeray: जागतिक मराठी नाट्यकर्मी संघाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट; नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी मांडल्या

परिणामी, अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या होत्या. सिनेसृष्टीवरही याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Raj Thackeray (Photo Credits: Instagram)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. परिणामी, अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या होत्या. सिनेसृष्टीवरही याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या अनेक निर्बंधांना शिथिलता देण्यात सुरुवात झाली असून नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास महाराष्ट्र सरकारने संमती दिली आहे. मात्र, तरीही मराठी कलाकरांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. याच संदर्भात जागतिक नाट्यकर्मी संघाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. तसेच नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी राज ठाकरे यांच्या समोर मांडल्या आहेत.

महाराष्ट्रात 50 टक्के आसनक्षमतेने नाट्यगृहे, सिनेमागृहे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परंतु, कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात मराठी कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता हळूहळू नाट्यगृहे सुरु होत असली तरीही अडचणी संपलेल्या नाहीत. आपल्या याच अडचणी मराठी कलाकारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या आहे. या शिष्टमंडळात प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे या सगळ्यांची उपस्थिती होती. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही यावेळी उपस्थित होते. हे देखील वाचा- Nilesh Rane's Tweet: मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्यावर कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करा; एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर निलेश राणे यांचे ट्विट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. याआधी महाराष्ट्रातील व्यायाम शाळा सुरु करण्यासाठी जिमच्या अनेक संघटनांनी त्याची भेट घेतली होती. राज ठाकरे यांच्या मागणीनंतर काही दिवसातच राज्यातील व्यायाम शाळा सुरु झाल्या होत्या. याबद्दल अनेक जिम संघटनांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.