Money Laundering Case: IREO ग्रुपचे चेअरमन ललित गोयल यांना ED कडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक
ईडीने त्यांना मंगळवारी दुपारी अटक केली. ललित गोयल यांना सोमवारी (15 नोव्हेंबर) चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते.
IREO ग्रुपचे चेअरमन ललित गोयल (Lalit Goyal) यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणी अटक केली आहे. ईडीने त्यांना मंगळवारी दुपारी अटक केली. ललित गोयल यांना सोमवारी (15 नोव्हेंबर) चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते. दरम्यान, ईडीने त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आणि थेट अटक केली. ललित गोयल यांच्यावर PMLA अन्वये कारवाई करण्यात येत आहे. गुंतवणुकदारांचे पैसे परस्पर इकडे-तिकडे वळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच प्रकरणात त्यांची चौकशीही झाली होती.
ललीत गोयल यांनी सन 2010 मध्ये सुमारे 73 मिलियन अमेरिकी डॉलर वेगवेगळ्या ट्रस्टमध्ये हस्तांतरीत केले होते. ज्याची सध्या ईडी चौकशी करत आहे. हे सर्व पैसे गुंतवणुकदारांचे होते. IREO हा दिल्ली-एनसीआर येथील एक मोठा रियल स्टेच ग्रुप आहे. ललित यांचे नाव पँडोरा पेपर लीक मध्येही आले होते. (हेही वाचा, Nawab Malik Statement: भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिरासाठी दान केलेली जमीन बळकावली आहे, नवाब मालिकांचा आरोप)
ललीत गोयल हे भाजप नेते सुधांशु मित्तल यांचे नातेवाईक आहेत. ललीत गोयल यांच्या बहिणीचा विवाह भाजप नेते सुधांशु मित्तल यांच्यासोबत झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, गोयल हांना दिल्ली एयरपोर्ट वरुन गुरुवारी ताब्यात घेण्यात आले. ते अमेरिकेला जाण्याच्या तयारीत होते, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.