International Young Eco-Hero 2021: मुंबईतील अयान शांकता याला पर्यावरण संबंधित योजनेसाठी मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पर्यावरण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या मुंबईतील 12 वर्षीय मुलाला पर्यावरणासंबंधित कठीण समस्यांवर उपाय काढण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

Mumbai Environmental Activist Ayaan Shankta. (Photo Credits: YouTube Grab)

International Young Eco-Hero 2021:  पर्यावरण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या मुंबईतील 12 वर्षीय मुलाला पर्यावरणासंबंधित कठीण समस्यांवर उपाय काढण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्यासाठी त्याला '2021 इंटरनॅशनल यंग इको-हिरो' च्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या एका बातमीनुसार, अयान शांकत (Ayaan Shankta) असे त्याचे नाव आहे.(मुंबई मध्ये 2022-23 मध्ये सुरू होणार भारतातील पहिली Cambridge Affiliated पालिका शाळा)

अयान याने आपली योजना 'पवई तलावाचे संवर्धन आणि पुनर्वसन' (Conservation and Rehabilitation of Powai Lake) यासाठी 8-14 वयोगटात तिसरे स्थान पटाकवले आहे. अयान हा जगभरातील 25 तरुण पर्यावरण कार्यकर्त्यांपैकी एक असून त्याने 'अॅक्शन फॉर नेशन' (FFN) ने त्याला इंटरनॅशनल यंग इको-हिरो पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पुरस्काराअंतर्गत पर्यावराप्रति जागृक असलेल्या 8-16 वयोगटातील तरुणांना सन्मानित केले जाते. पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रमुख पाउले उचलणाऱ्यांच्या सन्मार्थ हा पुरस्कार दिला जातो.

पवई तलावाजवळ राहणाऱ्या अयान याने असे म्हटले की, या तलावाला स्वच्छ आणि सजीव स्त्रोत बनवणे हे माझे ध्येय आहे. पवईचा तलाव हा एकेकाळी पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत होता. मात्र येथे आता सर्वत्र कचरा आणि गटाराचे पाणी जमा झाले आहे.(मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास 3 तासांत? महाराष्ट्र सरकार 70 हजार कोटीच्या कोकण एक्सप्रेस च्या तयारीत) 

अयान याच्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट प्रदूषण, तलावाला स्वच्छ करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जागृकता निर्माण करणे आहे. जागृकता निर्माण करण्यासाठी गैर स्वयंसेवी संघटनेसोबत काम करण्याव्यतिरिक्त अयान याने तलावाच्या स्थितीवर एक कार्य रिपोर्ट सुद्धा तयार केला आहे. तो सध्या पवई तलावावरील एका डॉक्युमेंटरीवर काम करत आहे.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

NZ vs ENG, 3rd Test Match Day 2 Preview: इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारू शकतील का? की न्यूझीलंडचे गोलंदाज कहर करणार, दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी बॅटल आणि लाइव्ह स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील घ्या जाणून

Tim Southee Retirement: निवृत्तीनंतर टीम साऊदी झाला भावूक, मुलीला कडेवर घेऊन उतरला मैदानात; शानदार कारकिर्दीचा शेवट (Watch Video)

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 1 Stump: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडची दमदार सुरुवात, 9 विकेट गमावून केल्या 315 धावा; येथे पहा स्कोअरकार्ड