Raj Thackeray यांचा अयोद्धा दौरा रद्द पण नियोजित तारखेनुसार त्यांचा शिलेदार अविनाश जाधव रामजन्मभूमीत दाखल; दर्शन घेत शेअर केला 'हा' व्हीडिओ !
आज 5 जून दिवशी मनसेच्या नियोजित अयोद्धा दौरा दिवशी राज ठाकरेंचे शिलेदार आणि निष्ठावंतांपैकी एक अविनाश जाधव मात्र अयोद्धेमध्ये पोहचले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही महिन्यांपूर्वी 5 जून दिवशी अयोद्धा दौरा (Ayodhya) जाहीर केला होता. मनसैनिकांनी त्याच्या दृष्टीने तयारी देखील सुरू केली होती. दरम्यान भाजपा खासदार बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरेंनी उत्तरप्रदेशची माफी मागावी आणि मगच रामजन्मभूमीत पाय ठेवावा अशी भूमिका घेतली आणि संघर्ष पेटला. राज ठाकरेंनी नंतर आपला अयोद्धा दौरा तूर्तास स्थगित असं ट्वीट केले. पण आज 5 जून दिवशी मनसेच्या नियोजित अयोद्धा दौरा दिवशी राज ठाकरेंचे शिलेदार आणि निष्ठावंतांपैकी एक अविनाश जाधव मात्र अयोद्धेमध्ये पोहचले आहेत.
अविनाश जाधव यांनी आज सकाळी रामलल्लांचं दर्शन घेत एक व्हिडिओ पोस्ट करून त्याची माहिती दिली आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी आपल्यासोबत काही मनसैनिक देखील अयोद्धेमध्ये आले असल्याचं सांगितलं आहे. तसेच प्रत्येक हिंदूने, मराठी माणसाने या ठिकाणी भेट द्यावी असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Raj Thackeray Pune Rally: अयोद्धा दौर्याला विरोधाची रसद महाराष्ट्रातून; राज ठाकरेंचा मोठा आरोप .
अविनाश जाधव अयोद्धेमध्ये
अविनाश जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे/ पालघर जिल्हाध्यक्ष आहेत. ठाण्यात मनसेला बळकटी देण्यासाठी अविनाश जाधव काम करत असतात. अनेक आंदोलनांमध्ये मनसेचा ठाण्यातील चेहरा म्हणून ते आघाडीवर येऊन काम करत असतात.
मनसेच्या काही वर्षांपूर्वी युपी, बिहार या परप्रांतीयांच्या लोंंढ्या विरूद्धच्या आंदोलनामुळे बृजभूषण सिंह यांनी या मनसेच्या अयोद्धा दौर्याला विरोध केला होता. महारॅली काढत त्यांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्ते अयोध्येत आल्यास आम्ही त्यांना शरयू नदीत बुडवू, अशी गर्जना केली होती.