मुंबई: प्रलंबित मागण्यांसाठी वडाळा डेपो बाहेर बेस्ट कर्मचा-यांचे उपोषण सुरुच
आपल्या प्रलंबित मागण्यांवर जोपर्यंत समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत बेस्ट (BEST) कर्मचारी आपले उपोषण सुरुच ठेवणार असे अशी घोषणा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे अध्यक्ष (BSKKS) शशांक राव (Shashank Rao) यांनी केली.
आपल्या प्रलंबित मागण्यांवर जोपर्यंत समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत बेस्ट (BEST) कर्मचारी आपले उपोषण सुरुच ठेवणार असे अशी घोषणा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे अध्यक्ष (BSKKS) शशांक राव (Shashank Rao) यांनी केली. बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत झालेल्या बैठकीत बेस्ट कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार असल्याचा निर्णय जरी झाला असला तरीही अजून कर्मचा-यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे उपोषण अजून काही दिवस सुरु राहणार असून पुढे काय पाऊल उचलायचे या बाबत निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.
वडाळा डेपो बाहेर बेस्टचे काही कर्मचारी उपोषणाला बसले असून त्यांनी शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करत आहेत. महापालिका पगारवाढीचे आमिष दाखवून कर्मचा-यांची दिशाभूल करत आहे असे राव म्हणाले.
ANI चे ट्विट:
"सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला अजून 2750 कोटी इतकी अतिरिक्त निधीची गरज आहे. पण आम्ही बेस्टच्या मुख्य व्यवस्थापकाशी बातचीत केल्यानंतर आम्ही महापालिकेला जास्तीत जास्त 789 कोटी इतकाच निधी देऊ शकतो असे सांगितले आहे. याचा अर्थ शिवसेना आमच्याशी खोटं बोलत आहे" असे राव म्हणाले.
हेही वाचा- BEST कामगारांचे बेमुदत उपोषण सुरु; उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न निष्फळ
मुंबई लोकल रेल्वे नंतर बेस्ट हे वाहतुकीचे सर्वात मोठा मार्ग आहे. बेस्टमधून दर दिवसा 80 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे हे सर्व पाहता, लवकरात लवकर यावर योग्य तो तोडगा काढण्यात यावा असे राव म्हणाले.