इराण मधून आलेल्या 44 भारतीयांची दुसरी तुकडी मुंबई मध्ये लॅन्ड; घाटकोपरच्या Indian Navy Quarantine Facility मध्ये दाखल
सध्या या सार्यांना मुंबईमधील घाटकोपर येथील Indian Navy quarantine facility मध्ये ठेवण्यात आले आहे.
चीन नंतर इराण मध्ये कोरोना व्हायरसचं थैमान पसरलं असताना तेथे अडकलेल्या भाविकांना सुखरूप भारतामध्ये आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आज 44 भारतीयांची दुसरी तुकडी इराणमधून भारतामध्ये आली आहे. सध्या या सार्यांना मुंबईमधील घाटकोपर येथील Indian Navy quarantine facility मध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान काल भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी संसदेमध्ये माहिती देताना काही प्रमाणा कमर्शिअल विमान इराण मध्ये प्रवेश करू शकतात. त्याच्या मदतीने इराण, तेहरान येथे अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आज दाखल झालेले 44 भाविक इराण एअर फ्लाईटच्या द्वारा मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी IAFच्या 58 जणांची सुटका करण्यात आली होती.
धार्मिक यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भारतीय इराणमध्ये दाखल होतात. यंदादेखील 1200 हून अधिक भारतीय इराणमध्ये आहेत. दरम्यान इराणमधून भारतात भाविकांना घेऊन येण्यापूर्वीच त्यांची चाचणी केली जाते अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
118 देशांमध्ये सध्या कोरोना व्हायरस पसरला असून जगभरात सुमारे सव्वा लाख नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर 4600 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या इराणमध्ये 10,000 जणांना कोरोनाची लागण झाली असून 430 लोकांनी आपला जीव गमावला आहे. इराणचे उपराष्ट्रपती तर 24 सरकारी अधिकार्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
ANI Tweet
भारतामध्येही कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 80च्या वर गेली असून महाराष्ट्रात तो 16 वर पोहचला आहे. त्यामुळे आता या जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणा, वैद्यकीय सुविधा सुसज्ज करण्यात आल्या आहेत. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी आता 15 एप्रिल पर्यंत परदेशी पर्यटकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे.