India First Undersea Tunnel: येत्या नोव्हेंबरमध्ये उघडणार भारतातील पहिला पाण्याखालील समुद्र बोगदा; गिरगाव ते वरळी अंतर अवघ्या 10 मिनिटांत

मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोस्टल रोड हा महत्वपूर्ण प्रकल्प असणार आहे. यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार. वाहतूक कोडींची समस्या दूर करण्यासाठी प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे.

Coastal Road | (Photo Credits: BMC/Website)

महाराष्ट्रातील दक्षिण मुंबईतील (South Mumbai) भारतातील पहिल्या समुद्राखालील जुळ्या बोगद्यांचे (India First Undersea Tunnel) काम जवळजवळ पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. गेली दोन वर्षे हे काम चालू आहे. माहितीनुसार भारतातील हा पहिला समुद्राखालचा बोगदा नोव्हेंबरमध्ये उघडला जाईल. द इंडियन एक्स्प्रेस मधील एका अहवालानुसार, 10.58 किमी लांबीचा मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट (Coastal Road Project) हा मरीन ड्राइव्हला वांद्रे-वरळी सी लिंकला जोडतो. समुद्राखालील बोगदे हे या कोस्टल रोड प्रकल्पाचे भाग आहेत. हाय-स्पीड कोस्टल रोडचे उद्दिष्ट पीक अवर्समध्ये गिरगाव ते वरळी हा 45 मिनिटांचा प्रवास फक्त 10 मिनिटांपर्यंत कमी करण्याचे आहे.

हे 12.19 मीटर व्यासाचे बोगदे समुद्रसपाटीपासून 17-20 मीटर खाली आहेत. याचा सुमारे 1 किलोमीटरचा भाग समुद्राखाली आहे. मलबार हिलमध्ये बोगदे 72 मीटर खोलीपर्यंत पोहोचतात. बोगद्याच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावरील पुढील भाग फायबरग्लासचा असेल. या प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, बोगद्याचे 93 टक्के काम पूर्ण झाले आहे.

बोगद्याच्या आत सहा लेव्हल क्रॉसिंग असतील, चार पादचाऱ्यांसाठी आणि दोन वाहनधारकांसाठी. प्रत्येक बोगद्याला 3.2 मीटरच्या तीन लेन आहेत. बोगद्यामध्ये ऑपरेशनसाठी दोन लेन असतील, तर तिसऱ्या लेनचा वापर आपत्कालीन परिस्थितीत किंवा वाहनांची वाढ झाल्यास करता येईल. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशीनचा (TBM) वापर. टीबीएमचे वजन 1,700 टनांपेक्षा जास्त आहे आणि ते सुमारे 12 मीटर उंच आहे. बोअरिंगचे काम जानेवारी 2021 मध्ये सुरू झाले, तर टीबीएम असेंबलिंग आणि लॉन्च करण्याचे काम वर्षभरापूर्वी सुरू झाले. (हेही वाचा: आता मुंबई-ठाणे-पुणे मार्गावर धावणार 100 इलेक्ट्रिक बसेस; CM Eknath Shinde यांच्या हस्ते झाला शुभारंभ)

दरम्यान, मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोस्टल रोड हा महत्वपूर्ण प्रकल्प असणार आहे. यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार. वाहतूक कोडींची समस्या दूर करण्यासाठी प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12,721 कोटी खर्च येणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now