Mumbai Mucormycosis: कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेमध्ये मुंबईत म्युकोर्मायकोसिसचा पहिला रुग्ण नोंदवला

या व्यक्तीला मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Mucormycosis | (Photo Credit: File Photo)

भारत कोविड-19 संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पकडीत असताना, मुंबईत म्युकोर्मायकोसिस (Mumbai Mucormycosis) किंवा 'ब्लॅक फंगस' चे पहिले ताजे प्रकरण नोंदवले गेले आहे. मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यानचा म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis) पहिला रुग्ण (First Case) आढळला आहे. एका 70 वर्षीय वृद्धाला कोरोनावर मात केल्यानंतर म्युकर मायकोसिसची लागण झाली आहे. 5 जानेवारी रोजी पॉझिटिव्ह चाचणी घेतलेल्या 70 वर्षीय व्यक्तीला गेल्या आठवड्यात बुरशीजन्य संसर्गाशी संबंधित लक्षणे दिसू लागली होती. या व्यक्तीला मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

12 जानेवारी रोजी अशक्तपणाच्या तक्रारीनंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या रक्तातील साखरेची पातळी देखील 532 पर्यंत वाढली होती. हे उपचार चालू असतानाही, काही दिवसांनंतर रुग्णाने गालात दुखणे (जे असामान्य होते) त्यामुळे या रुग्णाला 12 जानेवारीला मुंबई सेंट्रल येथील वॉक्हार्ड्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले 15 जानेवारीपर्यंत रुग्णांची सूज आणि वेदना मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि रुग्णाने लिड एडेमॅप्टोसिस विकसित केला होता. चाचणीसाठी पाठवलेल्या नाकातील स्वॅबमध्ये देखील बुरशीजन्य हायफेची वाढ उघड झाली होती. डॉक्टरांनी तातडीने एमआयआर केला. पण त्यामध्ये हाडांची कोणत्याही प्रकारे झीज झालेली नाही, असं निषपण्ण झालं. (हे ही वाचा Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 6149 रुग्णांची नोंद; सध्या 44,084 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु)

म्यूकोर्मायकोसिस म्हणजे काय?

कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला 'म्युकर मायकॉसिस' म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते.

कोविड-19 मुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याने, संक्रमणास कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजीवांना (म्युकोर्मायसीट्स) अशा व्यक्तींवर परिणाम करणे सोपे जाते. कोविड-19 रूग्णांच्या उपचारांमध्ये शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादाला दडपून टाकणारी औषधे घेणे देखील समाविष्ट आहे. तिसर्‍या लाटेदरम्यान मुंबईतून अशा प्रकारची ही पहिलीच केस नोंदवली गेली असली तरी, शहरात (आणि देशाच्या इतर भागांमध्ये) मागील वर्षभरात हजारो प्रकरणे पाहिली गेली आहे.