Coronavirus Cases In Pune: गेल्या 24 तासात पुण्यात सर्वाधिक 1 हजार 803 नवे कोरोनाबाधित रुग्ण
यापैकी 1 हजार 32 रुग्ण हे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 399 वर पोहचली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.
Coronavirus Cases In Pune: गेल्या 24 तासात पुण्यात (Pune) सर्वाधिक 1 हजार 803 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patients) आढळून आले आहेत. यापैकी 1 हजार 32 रुग्ण हे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 399 वर पोहचली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.
पुणे जिल्ह्यात गुरुवारी 34 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला. तसेच 581 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या भोवताली असलेल्या हवेली तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषीत करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये 13 जुलै ते 23 जुलै असा 10 दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर! राज्यात आज 7862 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 226 जणांचा मृत्यू)
पुण्यात 10 दिवसांचा हा लॉकडाऊन पाच-पाच दिवसांच्या दोन टप्प्यांमध्ये असणार आहे. पहिल्या पाच दिवसांमधे फक्त दूध, औषधं आणि वृत्तपत्रं सुरू राहणार आहेत. या टप्प्यात इतर सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. याशिवाय नागरिकांना दुसऱ्या टप्प्यांत हव्या असलेल्या गोष्टींच्या सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या कालावधीत खरेदी करता येणार आहेत.
दरम्यान, आज महाराष्ट्रात 7862 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच दिवसभरात 226 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 5366 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,38,461 इतकी झाली आहे.