दिलासादायक! महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत एकाही पोलिसाला कोरोनाची लागण नाही; COVID-19 पॉझिटिव्ह महाराष्ट्र पोलिसांच्या मृतांचा आकडा 33 वर
मात्र या संसर्गामुळे 2 दोघांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 33 पोलिस कोरोना व्हायरस विषाणूमुळे दगावल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कोविड योद्धा (Covid Warriors) दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. यात अनेक डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलिसांना कोरोनाची लागण झाली. आपला जीव धोक्यात घालून हे कोविड योद्धा जनतेची सेवा करत आहे. महाराष्ट्रातील पोलिसांनाही (Maharashtra Police) कोरोनाची लागण झपाट्याने होत असतानाचे चित्र समोर येत आहे. असे असताना एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील एकाही पोलिसाला कोरोनाची लागण झाली नाही. मात्र या संसर्गामुळे 2 दोघांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 33 पोलिस कोरोना व्हायरस विषाणूमुळे दगावल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे.
त्याचबरोबर सद्य घडीला महाराष्ट्र राज्यात एकूण 2561 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्हे हे कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने त्यांना रेड झोन घोषित करण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तेथे सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात पोलीस दलातील 4 जणांना कोरोनाची लागण तर एकाचा मृत्यू, एकूण COVID19 चा आकडा 2561 वर पोहचला
कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असला तरीही वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स आपले कर्तव्य 24 तास बजावताना दिसून येत आहेत.त्याचसोबत कोरोनाबाधित रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून विविध ठिकाणी कोविड आणि क्वारंटाइन सेंटरची सुद्धा उभारणी करण्यात आली आहे. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी वेळोवेळी योग्य त्या नियमांची अंमलबजावणी करताना दिसून येत आहे.
राज्यात आतापर्यंत 841 लोकांना पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात 80,163 वाहने जप्त करण्यात आली आहेत. लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी नागरिकांकडून 6,54,93,411 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.