Pune Crime: पुण्यामध्ये बाजारभावापेक्षा कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखवून जोडप्याची फसवणूक, दोघांना अटक

या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी शनिवारी टोळीतील दोघांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत माने यांना त्यांच्या मैत्रिणीने एक व्यक्ती कमी दराने सोने विकत असल्याची माहिती दिली होती.

fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

बाजारभावापेक्षा कमी दरात सोने (Gold) देण्याचे आमिष दाखवून एका जोडप्याची फसवणूक (Fraud) केली आहे. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी (Bangur Nagar Police) शनिवारी टोळीतील दोघांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत माने यांना त्यांच्या मैत्रिणीने एक व्यक्ती कमी दराने सोने विकत असल्याची माहिती दिली होती. मैत्रिणीने सांगितले की, तिला ओळखीच्या व्यक्तीने आरोपीबद्दल माहिती दिली होती. सोने खरेदीसाठी  माने शुक्रवारी 2 लाख रुपयांसह मुंबईत आले. मैत्रिणीच्या सांगण्याप्रमाणे तिघे मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये (Infinity Mall) पोहोचले. जिथे त्यांना भेटण्याचे आश्वासन देण्यात आले होते. थोड्या वेळाने एक व्यक्ती एक पिशवी घेऊन घटनास्थळी आला, त्यात सोन्याचे बिस्किट होते.

त्यानंतर त्यांनी माने यांना पैसे दाखवण्यास सांगितले, जे माने यांनी मान्य केले. मात्र, माने यांनी सोन्याचे बिस्कीट बघण्यास सांगितले असता आरोपीने नकार दिला.  वादानंतर संगीता लोखंडे ही महिला मध्यस्थी करत घटनास्थळी पोहोचली. तिने माने याला समजावून सांगितले की, आरोपीला रोख रक्कम दे आणि नंतर सोन्याची बिस्कीट घे. हेही वाचा Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांचीतस्करी केल्याप्रकरणी मुंबईतील आठ जणांना अटक, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

माने यांनी रोख रकमेची बॅग दिल्यानंतर आरोपींनी वाहनात बसून तेथून पळ काढला.  बांगूर नगर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही लोखंडेला अटक केली असून तिने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे. आरोपींना गाडीतून पळून जाण्यास मदत करणारा दुसरा आरोपी सनीत महाडिक यालाही अटक करण्यात आली आहे. मानेचे पैसे घेऊन पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस आता शोध घेत आहेत.



संबंधित बातम्या