Nashik Suicide Case: नाशिकमध्ये 20 वर्षीय वयाने मोठ्या असलेल्या महिलेच्या प्रेमात पडलेल्या तरुणाची आत्महत्या

पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहोचले असता तो नाशिकच्या ओझर परिसरात राहत असल्याचे आढळून आले. गेल्या एक वर्षापासून त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. लग्न करण्यासाठी ही महिला आपल्या मुलाचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Nashik Suicide Case: नाशिकमध्ये 20 वर्षीय वयाने मोठ्या असलेल्या महिलेच्या प्रेमात पडलेल्या तरुणाची आत्महत्या
(Photo Credits: Pixabay, Open Clip Art)

नाशिक (Nashik) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 25 वर्षीय तरुणाला 20 वर्षीय वयाने मोठ्या असलेल्या महिलेच्या प्रेमात पडणे जीवघेणे ठरले आहे. लग्नासाठी या महिलेने त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केला, त्यामुळे त्याने आत्महत्या (Nashik Suicide Case) केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रियकराच्या आत्महत्येने घाबरलेल्या महिलेने त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून अपघात झाल्यासारखे भासविण्याचा प्रयत्न केला. पोलिस सहाय्यक मधुकर गावित यांनी सांगितले की, 26 फेब्रुवारी रोजी महामार्गावर तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात भुसावळ येथील रमेश रवींद्र मोरे (25) असे तरुणाचे नाव आहे. त्यानंतर पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहोचले असता तो नाशिकच्या ओझर परिसरात राहत असल्याचे आढळून आले. गेल्या एक वर्षापासून त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. लग्न करण्यासाठी ही महिला आपल्या मुलाचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

अहवालात फाशीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले

नातेवाइकांशी संपर्क साधल्याने काही सुगावा पोलिसांच्या हाती लागला. यादरम्यान पोलिसांना पोस्टमार्टम रिपोर्टही मिळाला. या अहवालात फाशीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नव्याने तपास केला असता रमेशने महिलेच्या घरी गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर महिलेने तिचा 20 वर्षांचा मुलगा आणि मित्रासह त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. अशाप्रकारे त्यांनी हे आत्महत्येचे प्रकरण रस्ता अपघात ठरविण्याचा प्रयत्न केला. (हे ही वाचा Mumbai Shocker: हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी हादरली मुंबई)

बसमधल्या भेटीनंतर प्रेमात रुपातंर

बसमध्ये प्रवास करत असताना रमेशची या महिलेशी भेट झाली होती. यादरम्यान दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर शेअर केले होते. यानंतर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. यानंतर दोघांची जवळीक वाढली आणि तरुण महिलेच्या घरी राहू लागला. तिचा प्रियकर तिला सोडून गावी जाऊन लग्न करेल, असे महिलेला वाटले, असा आरोप आहे. त्यामुळे ती त्याचा छळ करत असे, त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2022 11:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).