Pet Dog Kidnapped In Mumbai: मुंबईत मालकावर संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने केले पाळीव कुत्र्याचे अपहरण; कारण ऐकून लावालं डोक्याला हात!
जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. सध्या तो फरार आहे. प्रेक्सी पोमेरेनियन जातीची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पांढरकर एका खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये पर्यवेक्षक होते आणि त्यांचा मासिक पगार 25 हजार रुपये होता.
Pet Dog Kidnapped In Mumbai: जुहू परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे सुरक्षा पर्यवेक्षक राजेंद्र पांढरकर यांनी त्यांच्या मालकावर एक विचित्र प्रकारचा सूड घेतला. मालकाने त्याचा पगार कापला होता. संतप्त सुरक्षा पर्यवेक्षकाने मालकाच्या 14 वर्षांच्या पाळीव कुत्र्या प्रेक्सीचे अपहरण (Kidnapping) केले. हे प्रकरण मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचले. जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. सध्या तो फरार आहे. प्रेक्सी पोमेरेनियन जातीची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पांढरकर एका खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये पर्यवेक्षक होते आणि त्यांचा मासिक पगार 25 हजार रुपये होता.
मालकाने कापले 4 हजार रुपये -
गेल्या महिन्यात, कंत्राटदाराशी झालेल्या वादानंतर पांढरकर यांच्या पगारातून 4000 रुपये कापण्यात आल्याचे आदिती जोशी यांनी सांगितले. संतप्त पांढरकर यांनी कंत्राटदाराशी अनेकवेळा चर्चा केली. पण हे प्रकरण सुटले नाही. त्यानंतर मालकाच्या वागण्याने संतप्त झालेल्या पांढरकरने प्रेक्सीचे अपहरण करण्याचा कट रचला. (हेही वाचा - Chhatrapati Sambhaji Nagar Kidnapping: पैशांच्या वादातून एकाचे अपहरण, तातडीने सुटका; छत्रपती संभाजीनगर येथी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)
प्राप्त माहितीनुसार, ही घटना 15 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता घडली. पांढरकर हे महिनाभराच्या अनुपस्थितीनंतर आठ दिवसांपूर्वीच कामावर परतले होते. जोशी कुटुंबीयांनी प्रेक्सीला नेहमीप्रमाणे फिरायला जाण्यासाठी सुरक्षा रक्षकाकडे सोपवले होते. त्यानंतर तो प्रेक्सीसोबत पळून गेला. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो कुत्र्यासोबत ऑटो रिक्षात चढताना आणि नंतर अंधेरी स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढताना दिसत होता. (हेही वाचा - Navi Mumbai Kidnapping Case: तळोजा येथे अडीच वर्षांच्या मुलीचे दिवसाढवळ्या अपहरण; आरोपी अज्ञात, पोलीस तपास सुरु)
आदिती यांनी सांगितलं की, प्रेक्सी गेल्या 14 वर्षांपासून आमच्या कुटुंबाचा भाग आहे. ती आमच्यासाठी फक्त पाळीव प्राणी नाही तर कुटुंबातील एक सदस्य आहे. कुटुंबाने पांढरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन बंद होता. आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही प्रेक्सी सापडली नाही. पांढरकरने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाला संदेश पाठवला की, त्याने प्रेक्सीचे अपहरण केले असून त्याला 25 हजार रुपये मिळाल्यानंतरच तो तिला सोडेल.
मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल -
जुहू पोलिसांनी पांढरकर यांच्याविरुद्ध बीएनएस कायद्याच्या कलम 316(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने त्याचा शोध तीव्र केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पोलिसांना संशय आहे की तो मुंबईतून पळून गेला असावा. पोलिसांनी सांगितले की ते आरोपींना लवकरच पकडण्याचा आणि प्रेक्सीला सुरक्षितपणे परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)