Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 97,648 वर

मात्र सध्याची राज्यातील स्थिती चिंताजनक आहे.

Coronavirus cases | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये जेव्हा पहिल्यांदा कोरोना विषाणूचा (Coronavirus) रुग्ण आढळला होता, तेव्हा कोणी विचारही केला नसेल की, अवघ्या काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळतील. मात्र सध्याची राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्रात आज 3607 नवीन कोरोना बाधित संक्रमित रुग्णांची व 152 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 97,648 इतकी झाली आहे. यावरून आता पुढच्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे 1 लाख रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. राज्यात आज नवीन 1561 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 46078 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 47,968 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

एएनआय ट्वीट -

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील उपाययोजनांबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मा.डॉ. हर्षवर्धन यांच्याशी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सवांद साधला. केंद्र शासनाने कंटेनमेंट झोनसाठी जे निकष केले आहेत, त्यात बदल करण्याबाबतची मागणी टोपे यांनी केली. कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर 28 दिवसांच्या ऐवजी 14 दिवस कंटेनमेंट झोनमध्ये व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा व त्यावर केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना पाठविण्यात याव्यात अशी ही मागणी आहे. (हेही वाचा: Coronavirus Cases In Dharavi: धारावीत आज 2 जणांचा मृत्यू तर 20 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

सध्या राज्यात लॉक डाऊन 5 मध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक घराबाहेर पडत आहे. हीच परिस्थिती राहिली तर संक्रमित रुग्णांची संख्या अजून वाढण्याची शक्यात आहे. दरम्यान, गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना बाधित 192 पोलीस अधिकारी, 1223 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. 35 पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांवर हल्ल्याच्या 263 घटना घडल्या असून, 846 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. राज्यात 203 रिलिफ कॅम्पमध्ये 8,068 लोकांची व्यवस्था केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif