Maharashtra SSC Result 2021: दहावीच्या निकालासंदर्भातल्या साईट्सबाबत महत्वाची माहिती समोर

मात्र, विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल (Maharashtra SSC Result 2021) आज जाहीर करण्यात आला.

Exam (Photo Credits: Facebook)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल (Maharashtra SSC Result 2021) आज जाहीर करण्यात आला. पण यावर्षी विक्रमी निकाल लागल्याने ज्या दोन संकेतस्थळांवर निकाल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉगिंग झाल्याने वेबसाईट क्रॅश झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता आले नाहीत. या निकालासंदर्भातल्या वेबसाईट्सबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता लागणार होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना अद्यापही निकाल पाहयता येत नाहीत. यासंदर्भात दिनकर पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. एकाच वेळी अनेक जणांनी ही वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे दोन्ही वेबसाईट क्रश झाली आहे. येत्या अर्ध्या तासात निकालासंदर्भातल्या साईट्स सुरू होतील, असे पाटील म्हणाले आहेत. या संदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- SSC Results 2021: निकालाची वेबसाईटच नाही तर ठाकरे सरकारही हँग झालंय; अतुल भातखळकर यांचा टोला

यावर्षी दहावीचा निकाल 99.95 टक्के लागल्याची माहिती शिक्षण मंडळाचे पत्रकार परिषदेत दिली आहे. दहावीच्या निकालाच्या result.mh-ssc.ac.in आणि mahahsscboard.in या दोन्ही वेबसाईट्स 4 तासांहून अधिक वेळ झाला असूनही तरी डाऊनच आहे. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दहावीच्या निकालाची वेबसाईट्स डाऊन झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणात थिणगी पडली आहे. दहावीच्या निकालावरून विरोधकांकडून महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.