Pune Shocker: भोसरीत 27 वर्षीय तरुणाने मित्राच्या अल्पवयीन बहिणीवर केला बलात्कार; आरोपीला अटक

भोसरी येथे एका 27 वर्षीय तरुणाला शनिवारी रात्री त्याच्या मित्राच्या 14 वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

Representational Image (Photo Credits: File Image)

Pune Shocker: पुण्यात (Pune) लैंगिक अत्याचाराची आणखी एका घटना समोर आली आहे. भोसरी (Bhosari) येथे एका 27 वर्षीय तरुणाला शनिवारी रात्री त्याच्या मित्राच्या 14 वर्षीय बहिणीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. शनिवारी दुपारी अल्पवयीन मुलगी तिच्या घरात एकटी असताना ही घटना घडली.

वृत्तानुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेतला. आरोपी शनिवारी तिच्या घरात घुसला. त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अल्पवयीन मुलीने आरोपीला प्रतिकार केला आणि जोरजोरात आरडाओरडा केली. त्यानंतर आरोपीने तिचे तोंड झाकून तिच्यावर जबरदस्ती केली. (हेही वाचा - Shocking! महिलेचे अपहरण करून मागितली खंडणी; पती रक्कम देऊ न शकल्याने नराधमांनी पीडितेवर केला सामूहिक बलात्कार)

अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर शनिवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, संतोष अंबाड असं या आरोपीचं नाव आहे. आरोपीने पीडितेच्या घरात कोणीही नसताना तिच्यावर बलात्कार केला. तसेच यासंदर्भात तक्रार केल्यास सोडणार नसल्याची धमकी दिली, असे भोसरी पोलिसांनी सांगितले आहे. यासंदर्भात पुढील तपास भोसरी पोलिस करत आहेत.