औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 163 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची आकडा 3819 वर पोहोचला

त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची आकडा 3819 वर पोहोचला आहे. आज वाढलेल्या 163 रुग्णांपैकी 112 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून 51 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात 2046 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

Coronavirus Outbreak | Representational Image| (Photo Credits: IANS)

औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) आज सकाळी 163 कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus Patients) नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची आकडा 3819 वर पोहोचला आहे. आज वाढलेल्या 163 रुग्णांपैकी 112 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून 51 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात 2046 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 203 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1570 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मंगळवारी औरंगाबादेतील गोरखेडागाव येथील 66 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वाचावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा - 'मुंबईचा राजा' बाबत गणेश गल्लीतील मंडळाने घेतला मोठा निर्णय! 22 फुटांऐवजी 4 फूटांची असणार गणेशाची मूर्ती)

महाराष्ट्रात कोरोना विषाणुने थैमान घातलं आहे. राज्यात सोमवारी 3721 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून दिवसभरात 62 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1962 जणांना काल डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यात 135796 कोरोनाग्रस्त असून आतापर्यंत राज्यात 67706 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात 15 मार्च रोजी पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. परदेशातून आलेल्या एका प्राध्यापक महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवसांतचं जिल्ह्यात सारीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. सारी आणि कोरोना विषाणूच्या संकटामुळे जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले होते.