Andheri By Election: आता थेट भाजप विरुध्द शिवसेना! निवडणूक रिंगणात कोण मारणार बाजी?

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तरी या निवडणुकीला घेवून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे कारण ही लढत थेट भाजप विरुध्द शिवसेनाअशी होणार आहे.

BJP Vs Shiv Sena | (Photo Credit: Archived, edited, representative images)

काही दिवसापूर्वीच निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या (Andheri East Constituency) पोट निवडणूकीची (By Election) घोषणा करण्यात आली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Shiv Sena MLA Ramesh Latke) यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व (Andheri East) विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (By Election) होणार आहे. तरी या निवडणुकीला घेवून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे कारण ही लढत थेट भाजप (BJP) विरुध्द शिवसेना (Shiv Sena) अशी होणार आहे. प्रमुख्याने या विभागात शिवसेनेची चांगली पकड आहे तरी रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर कुठल्या उमेदवाराला शिवसेनेकडून संधी दिल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तरी हा निर्णय फक्त शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) घेणार की आणखी कुणी या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसने या निवडणुकीसाठी आधीच शिवसेनेला पाठींबा दर्शवला आहे तर आता नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील उध्दव ठाकरेंना आपला पाठीबा असुन कॉंग्रेस आपला उमेदवार निवडणुक मैदानात उतरवणार नसल्याची जाहीर घोषणा केली आहे.

 

म्हणजेच पूर्व अंधेरीतील ही निवडणुक (Andheri East By Election) भाजप (BJP) विरुध्द महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) होणार आहे असं म्हण्टलं तरी हरकत नाही. म्हणजेच शिवसेनेची (Shiv Sena) ताकत या मतदार संघावर अधिक मजबूत झाल्याचं चित्र आहे. तरी भाजप निवडणूकी (BJP Election) बाबतीत काय रणनीती आखणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.  तरी या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचा फॅक्टर (Factor) ठरणार आहे शिंदे गट कारण शिंदे गट (Shinde Group) हा भाजपाच्या (BJP) बाजून उभा राहणार की स्वतच्या उमेदवार उतरवणार या बाबत अजूनही संभ्रम आहे. (हे ही वाचा:- Pankaja Munde Dussehra Rally: पदाची अपेक्षा नाही, परळी विधानसभा निवडणूक लढवणार- पंकजा मुंडे)

 

कारण जर शिंदे गटाने (Shinde Group) उमेदवार न उतरवल्यास भाजपला पाठींबा दर्शवल्यास ही बाब शिवसेनेसाठी अधिक जमेची बाजू असणार आहे. तसेच नामांकन भरण्यापूर्वी पक्षाकडे पक्ष चिन्ह असणं अनिवार्य आहे तरी धनुष्यबाण नेमका शिंदे गटाला मिळणार की ठाकरेंना याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गट असो वा शिंदे गट दोन्ही गटासाठी ही प्रतिष्ठेची लढाई झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now