Mumbai Shocker: भाचीवर बलात्कार करून गर्भधारणा; POCSO न्यायालयाकडून 50 वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

त्यानंतर आरोपीने अनेकवेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा मुलीने केला आहे.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Shocker: विशेष POCSO न्यायालयाने (POCSO Court) नुकतीच एका 50 वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) ठोठावली आहे. पुढील शिक्षण घेण्यासाठी आरोपीच्या घरी राहायला आलेल्या भाचीवर बलात्कार (Rape) करून गर्भधारणा केल्याबद्दल ही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष न्यायालयाने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देताना त्याला कोणतीही सवलत देण्यास नकार दिला. आरोपी फिर्यादीचा नातेवाईक असून त्याने फिर्यादीशी लैंगिक संबंध ठेवले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्याने प्रॉसिक्युट्रिक्सला गर्भधारणा केली. फिर्यादीने तिचा गर्भपात केला होता. पीडित मुलगी सध्या CWC च्या शेल्टर होममध्ये रहात आहे.

पीडितेने दावा केला की, काही वर्षांपूर्वी तिच्या काकांनी तिचा लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ती घरात एकटी होती. तेव्हा आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. मार्च 2017 मध्ये होळीनंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने अनेकवेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा मुलीने केला आहे. (हेही वाचा -Pune Shocker: वाघोलीत 21 वर्षीय तरुणीची समलिंगी जोडीदाराकडून हत्या; आरोपीविरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, पीडितेने तक्रारीत पुढे सांगितलं की, काही महिन्यांनंतर तिला पोटात दुखू लागले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले. 10 जुलै 2017 रोजी तिच्या काकाविरुद्ध सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुलै 2017 मध्ये दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिला मूळची उत्तर प्रदेशची आहे. तिथंच तिचं सहावीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी 2012 मध्ये ती मुंबईत राहायला गेली. पीडिता तिचा काका आणि त्याच्या कुटुंबासोबत राहत होती. (हेही वाचा - Agniveer Death in Mumbai: अग्निवीरसाठी नौदलात प्रशिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या,मालवणी पोलिसांकडून तपास सुरु)

तथापी, आरोपीने सर्व आरोप फेटाळून लावले. आरोपीने मुलगी अल्पवयीन नसल्याचे सांगितले. आरोपीने दावा केला की एवढ्या मोठ्या कालावधीत मुलीला त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची भरपूर संधी होती. पण तिने तसे केले नाही. हा संबंध संमतीने असल्याचं आरोपीने न्यायालयात सांगितलं.