Mumbai Local: सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु करण्याबाबत राजेश टोपे यांचे महत्वाचे वक्तव्य

केवळ अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Local train service resumes for all in Mumbai (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रसह (Maharashtra) संपूर्ण देशात आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेनंतर गेल्या अनेक महिन्यानंतर सुरु झालेली मुंबईची लोकल (Mumbai Local) सर्वसामन्यांसाठी पुन्हा बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत आहे. यामुळे मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची मागणीने जोर धरला आहे. परंतु, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने मुंबई महानगरपालिकेने सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याची बंदी कायम ठेवली आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकलमधून सर्वांना प्रवास करण्याची परवानगी देण्यासंदर्भात विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे.

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात कोरोना लसीकरणाबाबत ठराव मांडत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील करोना परिस्थिती आणि मुंबईतील उपनगरीय रेल्वेसंदर्भातही भाष्य केले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, “कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लावले आहेत. राज्यात दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवणे, विकेंड लॉकडाऊन व मुंबईसारख्या शहरात लोकल बंद ठेवणे, असे पर्याय आपण स्वीकारले आहेत. पण आता मुंबईत लोकल सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु, राज्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले तरच लोकल सुरू करता येईल, असे राजेश टोपे स्पष्ट केले आहे. हे देखील वाचा- Maharashtra: सगळ्यांची मान शरमेने खाली जाईल; 'त्या' व्हिडिओवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

याशिवाय, कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात झाल्याच आपल्याला आकडेवारीवरून दिसते. तसेच सर्वाधिक रुग्ण आणि त्यामुळे झालेले मृत्यू महाराष्ट्रात झालेले आहेत. याचबरोबर राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रुग्ण सापडले आहेत. तर, म्युकर मायकोसिसचे 5 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण करायची असेल, तर राज्यातील नागरिकांचे मोठ्या संख्येत लसीकरण करणे गरजेचे आहे.