Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; 9 व 10 डिसेंबरला शहरातील 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद

यामुळे या कामासाठी येत्या 9 व 10 डिसेंबर रोजी एस विभागातील काही परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) सुमारे चार किलो मीटर लांबीची ब्रिटीशकालीन तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे या कामासाठी येत्या 9 व 10 डिसेंबर रोजी एस विभागातील काही परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, याच दिवशी के पूर्व, एच पूर्व, एल उत्तर आणि जी उत्तर या विभागांमधये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे या सदर विभागातील नागरिकांना 8 डिसेंबर रोजी पाण्याचा पुरेसा साठा करण्याचे तसेच पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे मुंबई महानगरपालिकेने या भागातील सर्व नागरिकांना केले आहे.

‘एस’ विभाग-

डक लाईन, राजाराम वाडी, श्रीराम पाडा, खिंडीपाडा, टेंभीपाडा, सोनापुर, तुलशेतपाडा, प्रताप नगर, जमिल नगर, समर्थ नगर, सुभाष नगर, द्राक्षबाग, उत्कर्ष नगर, राजदीप नगर, लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा नाहूर (पश्चिम) व भांडुप (पश्चिम) परिसर, जयभीम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि लगतचा परिसर, फिल्टर पाडा, आंब्याची भरणी, रावते कंपाऊंड, राम नगर, पासपोली गाव, मोरारजी नगर, गांवदेवी टेकडी, सर्वोदय नगर या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार. हे देखील वाचा-

‘के पूर्व’ विभाग-

चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्र. 1 व 2, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगत सिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक परिसर, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग परिसर, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांती नगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत, ओम नगर, क्रांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक परिसर) सहार गाव, सुतार पाखाडी, विजय नगर मरोळ परिसर, सिप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

 

‘एल’ विभाग- 

कुर्ला उत्तर परिसर, बरेली मस्जिद, 90 फुटी रस्ता, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरी-मरी, घाटकोपर अंधेरी लिंक मार्ग, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, साकी विहार मार्ग, मारवा औद्योगिक मार्गा लगतचा परिसर, सत्य नगर पाईपलाईन या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

‘जी उत्तर’ विभाग

धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग, प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मिल मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, 90 फूट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग या परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

‘एच पूर्व’विभाग-

वांद्रे टर्मिनल सप्लाय झोन परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा

यामुळे संबंधित नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करुन सदर जलवाहिनी बदलविण्याच्या कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.