IPL Auction 2025 Live

Weather Forecast For Tomorrow: मुंबईसह राज्यात आज दमदार पाऊस, जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज

हवामान विभागानेही उद्याचा हवामान अंदाज (Weather Forecast For Tomorrow) व्यक्त करताना उद्यासह त्यापुढचे तीन दिवस या शहरांमध्ये हलका, मध्यम आणि काही वेळा दमदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

Mumbai Rain | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात दमदार पावसाने (Mumbai Rain Updates) हजेरी लावली आहे. हवामान विभागानेही उद्याचा हवामान अंदाज (Weather Forecast For Tomorrow) व्यक्त करताना उद्यासह त्यापुढचे तीन दिवस या शहरांमध्ये हलका, मध्यम आणि काही वेळा दमदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. केवळ मुंबईच नव्हे तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातही दमदार पावसाची उपस्थिती (IMD Weather Forecast) पाहायला मिळू शकते. आज (गुरुवार, 20 जून) पहाटेपासूनच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि कामावर जाणारे कामगार, नोकरदार वर्गांला चांगलीच कसरत करावी लागली.

आयएमडीकडून पावसाचा पिवळा अलर्ट जारी

मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन आयएमडीने अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. जारी करण्यात आलेला पावसाचा पिवळा इशारा प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टी आदी भागांसाठी आहे. ज्या भागांमध्ये सकाळपासूनच संततधार पावसाची उपस्थिती पाहायला मिळते आहे. पुढचे चार दिवस पावसाची स्थिती अशीच राहू शकते, असा  हवामान अंदाज आयएमडीने म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: पुढचे चार दिवस संततधार पाऊस, IMD कडून Yellow Alert जारी; जाणून घ्या हवामान अंदाज)

मुंबईमध्ये आभाळात मेघांची दाटी

मुंबई शहरात प्रामुख्याने सीएसएमटी, दादर, कुर्ला, चिंचपोकळी, लालबाग, वांद्रे, कुर्ला, चेंबूर अशा विविध ठिकाणी दमदार पाऊस पाहायला मिळत आहे. आकाशामध्ये काळ्याकुट्ट ढगांची दाटी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढचे तीन ते चार तास मुंबईमध्ये हवामान कायम राहणार असून मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीही घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी, असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढच्या तीन ते चार तासांमध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस कोसळू शकतो. (हेही वाचा, Mahrashtra Weather Update: पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भासह कोकणाला येलो अलर्ट)

एक्स पोस्ट

राज्यात दमदार पण काही भाग कोरडा ठाक

दरम्यान, मुबई आणि परिरात दमदार पाऊस बरसत असला तरी राज्यातील इतर अनेक ठिकाणी पावसाने अद्यापही दडी मारली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी आवश्यक पाऊस पडेपर्यंत वाट पाहावी. पाऊस पडण्यापूर्वीच बियाणे जमीनित पेरू नये. राज्यातील काही ठिकाणी पावसाचा शिडकाव झाला नाही. त्यामुळे या ठिकाणी तीव्र पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी टँकरनेही पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे. केवळ ग्रामिण भागच नव्हे तर मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्येही पाणीटंचाई जाणवते आहे. त्यामुळे जलव्यवस्थापन करुन पाणीकपात करुन पूरवठा करण्यावर प्रशासनाचा भर आहे. विद्यमान पावसाळ्यात पाणिपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरली जातील अशी आशा आहे. त्यामुळे सर्वांनाच आणखी दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.