Maharashtra Rain Alert: मुंबईसह पुणे, ठाणे कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

येत्या 24 तासांत राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार असा, अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढला असून सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. दरम्यान आज मुंबई, पुणे ठाणे, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा (Heavy Rain)  अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर कोकणाला ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.  दरम्यान या पावसामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी ही सुखावला आहे, या पावसामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे.  काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शेतीसाठी देखील पाणी उपलब्ध झाले आहे. (हेही वाचा - Pune Dam Water Storage: पुण्यातील खडकवासला धरणांत 97 टक्के पाणीसाठा, नागरिकांना दिलासा)

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. रविवारी आणि सोमवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला होता.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार बँटिंग सुरुच ठेवली. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली.

आज दुपारी किंवा संध्याकाळी मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय उपनगरात देखील पावसाचा इशारा हा देण्यात आला आहे.