दोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील
पण त्यात काही अंदाज बांधणेही चुकीचे आहे' असे म्हटले आहे
महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. प्रत्येक पक्षात नेत्यांचे इनकमिंग, आऊटगोईंग हा प्रकार सर्रासपणे सुरु असलेला पाहायला मिळतो. मात्र जेव्हा दोन भिन्न पक्षांचे वा विरोधक एकमेकांची भेट घेतात तेव्हा मात्र चर्चा तर होणारच. दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात त्यासोबत कार्यकर्त्यांमुळे अनेक चर्चा रंगू लागल्या. अनेक तर्क वितर्क काढण्यात आले. मात्र त्या भेटीनंतर या दोघांनीही याबाबत स्पष्टीकरण देत ही कोणतीही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी 'दोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार' असे विधान केले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या झालेल्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील याबाबत म्हणाले की, 'ही भेट नक्कीच चहा बिस्कीटसाठी झाली नसणार. पण त्यात काही अंदाज बांधणेही चुकीचे आहे' असे म्हटले आहे. Sanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य
दरम्यान भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण देत 'संजय राऊत यांना सामना वृत्तपत्रासाठी माझी मुलाखत घ्यायची होती. मी बैठकीसाठी काही अटी झालून दिल्या होत्या. त्यानुसार, या बैठकीत चर्चा झाली. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं ते म्हणाले.
तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. ते माजी मुख्यमंत्रीही आहेत. तसेच भाजपाने त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही. फडणवीस यांची भेट ही गुप्त स्वरुपीची नव्हती. आमच्या या भेटीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे, असं स्पष्ट केलं आहे.