मुंबई मध्ये टॅक्सी चालकाने भाडं नाकरालं तर थेट फोन वर मदतीला येणार Tardeo RTO ची स्पेशल टीम

संध्याकाळी 7 नंतर प्रवाशांना मदत करण्यासाठी या क्रमांकावरच व्हॉट्सअ‍ॅप, टेक्स्ट मेसेज केला जाऊ शकतो

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits-Twitter)

मुंबई मध्ये कमी अंतरासाठी रिक्षा, टॅक्सी येण्यास सरळ नकार देत असल्याने अनेकांचा खोळंबा होतो. आता यावर आरटीओ ताडदेव कडून एक तोडगा काढण्यात आला आहे. तुम्हांला जर टॅक्सीने नाकारलं तर तुम्ही आता थेट ताडदेव आरटीओ (Tardeo RTO) च्या स्पेशल टीमची मदत घेऊन टॅक्सीचालकांना दणका देऊ शकता. स्पेशल टीमचे सदस्य मुंबई शहरात गर्दीच्या ठिकाणी सतत भेटी देत असतात. यामध्ये रेल्वे स्टेशन, मार्केट्सचा समावेश आहे.

दरम्यान तुम्हांला ताडदेव स्पेशल टीम कडून मदत हवी असल्यास सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत 90762010101 क्रमांकावर मदत मागू शकता. संध्याकाळी 7 नंतर प्रवाशांना मदत करण्यासाठी या क्रमांकावरच व्हॉट्सअ‍ॅप, टेक्स्ट मेसेज केला जाऊ शकतो. तसेच तुमची तक्रार mh01taxicomplaint@gmail.com या इमेलद्वाराही करू शकता.

Free Press Journal सोबत बोलताना आरटीओ ऑफिसरने दिलेल्या माहितीनुसार, 'टीम मधील सार्‍या सदस्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या कंट्रोल रूम देखील उभारण्यात आली आहे. ज्या टॅक्सीचालकांकडून प्रवाशांना भाड नाकारलं जाईल, त्रास दिला जाईल त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. इन्सपेक्टर रॅन्क असलेल्या अधिकार्‍याकडून प्रत्येक कॉल घेतला जाईल'. नक्की वाचा: Water Taxi Service in Mumbai: जाणून घ्या वॉटर टॅक्सी सुविधेचा मार्ग, भाडे, वेळेसह नियमाबद्दल अधिक .

आरटीओच्या अधिकार्‍यांकडून टॅक्सी चालकांची देखील संवाद सुरू आहे. भाडं नाकारणं, त्यांना ओव्हरचार्ज करणं कसं कायद्याचं उल्लंघन करणारं आहे याची देखील माहिती करून दिली जात आहे. दक्षिण मुंबई तसेच शहराच्या इतर भागातही मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी हे प्रयत्न केले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने टूरिस्ट टॅक्सी, सामान्य टॅक्सी यांचा समावेश करून घेण्यात आला आहे.