राज ठाकरे यांनी प्रचारात केला असता 'हा' बदल तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिळवले असते घवघवीत यश
महत्वाचे म्हणजे, राज ठाकरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी, काही मतदारसंघातून जनतेने त्यांना प्रतिसाद दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा केवळ एकच आमदार निवडून आला तरी ९ मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवण्यात उमेदवारांना यश आले आहे. महत्वाचे म्हणजे, राज ठाकरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी, काही मतदारसंघातून जनतेने त्यांना प्रतिसाद दिला आहे. या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पराभव मागे अनेक कारण असल्याचे समजत आहे. त्यापैकी महत्वाचे म्हणजे, राज ठाकरे हे कायम जनेतेच्या संपर्कात राहीले असते तर निकालात बदल घडले असते, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पराभवानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. निवडणूक लढविण्याचा निर्णय उशीरा जाहीर झाल्यामुळे मनसैनिकांना आणि उमेदवारांना प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नाही, असे मत कीर्तिकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडण्याअगोदर राज ठाकर यांनी सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी मनसेला विरोधीपक्ष बनवा असे अवाहन केले होते. मात्र, या निवडणुकीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती अपयशच आले आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांना काही मतदारसंघातून जनतेचा प्रतिसाद मिळाला असून मनसेचे ९ आमदारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवण्यात यश आले आहे. तर काही मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली ओहत. यावर कीर्तिकुमार शिंदे म्हणतात, "मनसेच्या उमेदवारांना त्यांच्या प्रचारासाठी खूप कमी वेळ मिळाला. मनसे नेतृत्वाने निवडणूक लढण्याचा निर्णय लोकसभेनंतर लगेचच जाहीर केला असता, तर कदाचित वेगळे चित्र पाहायला मिळाले असते." हे देखील वाचा- शिवसेना नवनिर्वाचित आमदारांची आज मातोश्री वर बैठक; मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा होणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 'दुसऱ्या' क्रमांकाचे उमेदवार
मंदार हळबे - 45000 (डोंबिवली)
अविनाश जाधव - 73000 (ठाणे)
संदीप देशपांडे - 42600 (दादर, माहीम)
नयन कदम - 41000 (मागाठाणे)
संदीप जळगावकर - 42000 (भांडुप प.)
हर्षला चव्हाण - 29000 (मुलुंड प.)
किशोर शिंदे - 79000 (कोथरुड)
संतोष नलावडे - 38400 (शिवडी)
शुभांगी गोवरी - 39000 (भिवंडी ग्रामीण)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 'तिसऱ्या' क्रमांकावरचे उमेदवार
वीरेंद्र जाधव - 26700 (गोरेगाव)
प्रकाश भोईर - 4000 (कल्याण प.)
गजानन काळे - 27600 (बेलापूर)
अरूण सुर्वे - 25800 (दिंडोशी)
निलेश बाणखेळे - 22800 (ऐरोली)
रमेश राजूरकर - 32000 (वरोरा)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. तसेच त्याचवेळी जवळपास ९ उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.