IPL Auction 2025 Live

गडचिरोली जिल्ह्यात मेट्रो सुरु झाल्यास नक्षलवादाला आळा बसेल: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

माझी मेट्रो (Photo Credit : Youtube)

नागपुर शहरातील बहुप्रतीक्षित असा लोकमान्यनगर ते बर्डी या मार्गाचं आज लोकार्पण करण्यात आलं आहे. या सोहळ्याला अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनिल केदार हि सर्व मातब्बर मंडळी उपस्थित होती.

या उद्घाटन सोहळ्याला, सर्वच राजकीय पक्षातील नेते एकत्र उपस्थित असल्याने प्रत्येक नेता आपल्या पक्षाला त्याचे श्रेय देत होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मात्र एका महत्त्वाच्या मुद्दल हात घालत भाषण केले. नागपूर प्रमाणेच गडचिरोली मध्येही मेट्रो सुरु झाली तर नाक्षवादाला आला बसू शकतो असं ते म्हणाले.

गडचिरोलीत जर मेट्रो सुरु झाली तर हा मागास असलेला जिल्हा इतर जिल्ह्यांशी जोडला जाईल असं मत त्यांनी मांडलं. तसेच ते असंही म्हणाले की मेट्रो प्रकल्पांची सध्या नागपूर, गडचिरोली सारख्या भागांना जास्त गरज आहे. आणि म्हणूनच महाविकासआघाडी सरकार त्या प्रकल्पांच्या कामात अडथळा आणण्याचं काम कधीही करणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Nagpur Metro's Aqua Line च्या पहिल्या भागाचं लोकार्पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'नागपूर मेट्रो'चं उद्घाटन; जाणून घ्या स्थानकं, तिकीट दर ते फेर्‍याचं वेळापत्रक

दरम्यान,  नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे आज उदघाटन करण्यात आले असून हि मेट्रो सेवा सीताबर्डी ते लोकमान्यनगर या दोन ठिकाणा जोडेल. हि संपूर्ण मेट्रो लाईन 11 किलोमीटर लांबीची असणार आहे. मुख्य म्हणजे या मार्गावर एकूण 11 स्टेशन आहेत. त्यातील एकूण सहा मेट्रो स्टेशन सुरु आजपासून होत आहेत.