Kirit Somaiya On Sharad Pawar: शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर समोर येऊन लढावे- किरीट सोमय्या

"धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर मला येणारे धमक्यांचे कॉल्स शरद पवारांनी तात्काळ थांबवावे आणि हिंमत असेल तर समोर येऊन लढावे" अशा शब्दांत शरद पवारांवर सडकून टिका केली आहे.

Kirit Somaiya And Sharad Pawar (Photo Credits: PTI)

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांचा राजीनामा स्विकारला जाणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. यात आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देखील "मला वेगवेगळ्या लोकांकडून धमकीचे फोन येत असून पोलिसांना देखील याची कल्पना आहे." असे सांगितले आहे.

"धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर मला येणारे धमक्यांचे कॉल्स शरद पवारांनी तात्काळ थांबवावे आणि हिंमत असेल तर समोर येऊन लढावे" अशा शब्दांत शरद पवारांवर सडकून टिका केली आहे.

हेदेखील वाचा- Sharad Pawar on Dhananjay Munde: सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही- शरद पवार

दरम्यान "आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी" असे शरद पवारांनी आज घेतलेल्या बैठकीत भूमिका स्पष्ट केली.

तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप वैयक्तिक आणि कौटुंबिक आहेत. त्यामुळे राजकरण यामध्ये आणण्याची गरज नाही आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष यावर योग्य ती भुमिका घेत निर्णय घेईल" असे म्हटले आहे.