Chhagan Bhujbal Claims Threat To Life: 'माझी हत्या होऊ शकते'; मराठा विरोधी भूमिकेवरून जीवाला धोका असल्याचा छगन भुजबळांचा दावा

छगन भुजबळ मराठा आरक्षणाचा ओबीसी कोट्यात समावेश करण्यास विरोध करत आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देऊ नये, अशी भूमिका सर्व पक्षांप्रमाणे आपणही घेत असल्याचे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal (Photo Credits: ANI)

Chhagan Bhujbal Claims Threat To Life: महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी 'माझी हत्या होऊ शकते', असा खळबळजनक दावा केला आहे. पोलिसांच्या गुप्तचर अहवालाचा हवाला देत छगन भुजबळ यांनी बुधवारी विधानसभेत सांगितलं की, 'मला गोळ्या घातल्या जाऊ शकतात. गेल्या दोन महिन्यांपासून आपल्याला धमक्या येत आहेत.' काही दिवसांपूर्वी काही लोकांनी छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) बोलू नका, असं सांगितले होतं.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आपल्या भाषणात छगन भुजबळ म्हणाले की, त्यांची प्रतिमा मराठा आरक्षणविरोधी अशी निर्माण केली जात आहे, तर ते मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीत. छगन भुजबळ मराठा आरक्षणाचा ओबीसी कोट्यात समावेश करण्यास विरोध करत आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देऊ नये, अशी भूमिका सर्व पक्षांप्रमाणे आपणही घेत असल्याचे भुजबळ म्हणाले. त्यांना दररोज फोनवर शिवीगाळ आणि धमक्या येत आहेत. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरंगे यांनी भुजबळांवर मराठा आणि ओबीसी वर्गामध्ये तेढ पसरवल्याचा आरोप केला होता. भुजबळांना राज्यातील वातावरण बिघडवायचे आहे, असे जरंगे म्हणाले होते. (हेही वाचा -Maratha Reservation: मराठा आरक्षणामुळे तरुणाची छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर आत्महत्या, संभाजी नगर येथील घटना)

छगन भुजबळ यांनी विधानसभेत केलेल्या दाव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यांनी ओबीसींसाठी कोणतेही धोरण बनवले नसून त्यांची केवळ पिळवणूक सुरू आहे. महाराष्ट्र सरकारला आरक्षणापासून मुक्ती मिळवायची आहे आणि त्यासाठी ओबीसी आणि मराठा यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून या लढ्यात त्यांना आरक्षणाचा विसर पडेल. आरक्षण टाळण्यासाठी भाजपने ही योजना आखली आहे, अशा चर्चांना सध्या उधाण आलं आहे. (हेही वाचा - Maharashtra Winter Session 2023: संसदेतील घटनेनंतर नागपूर अधिवेशनातही गॅलरी पास देणे बंद)

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते रोहित पवार म्हणाले की, छगन भुजबळ ज्या प्रकारची वक्तव्ये करत आहेत ते मला मान्य नाही. मी अशा भाषणांच्या विरोधात आहे. त्यांच्या जीवाला धोका असेल तर सरकारने याकडे लक्ष देऊन त्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे. महाराष्ट्रात कुणाला जीवे मारण्याची धमकी देणे योग्य नाही. आम्ही याच्या पूर्णपणे विरोधात आहोत.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील