Coronavirus: सर्व मुंबईकरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याऐवजी केवळ 'या' लोकांनाच या गोळ्या देण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय

धारावीतील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ‘हाय रिस्क’ व्यक्तींनाही हा डोस दिला जाणार आहे.

Medicines Representative Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मुंबईतील असंख्य मुंबईकरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा (Hydroxychloroquine) चा डोस देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने काल घेतला होता. मात्र या गोळ्या खूपच स्ट्राँग असून हृदयासंबंधीच्या धोक्याचे कारण सांगत BMC ने मागे घेतला आहे. मुंबईकरांना कोरोना विरुद्ध लढण्यासाठी मुंबईकरांना या गोळ्या देण्याचा निर्णय BMCने घेतला होता. मात्र आता ही औषधे ठराविक लोकांनाच देण्यात येणार आहे. जेणेकरुन लोकांवर याचा विपरित परिणाम होणार नाही.

BMC च्या नव्या निर्णयानुसार, ‘कोरोना’ची लागण न झालेल्या मात्र क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती, पोलिस आणि आरोग्य कर्मचारी यांनाच हा डोस दिला जाणार आहे. धारावीतील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ‘हाय रिस्क’ व्यक्तींनाही हा डोस दिला जाणार आहे. Hydroxychloroquine चा पुरवठा केल्याबद्दल इस्त्राईल पंतप्रधान Benjamin Netanyahu यांनी मानले PM नरेंद्र मोदी यांचे आभार!

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा डोस देण्यासंबंधी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल माहिती दिली होती. वरळी आणि धारावी या ‘कोरोना हॉटस्पॉट’ असलेल्या परिसरातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महापालिका हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देणार होती. वय वर्ष 18 ते 55 वयोगटातील निरोगी नगारिकांना हा डोस दिला जाणार असल्याचं महापौर म्हणाल्या होत्या, परंतु आता हा निर्णय रद्द झाला आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मूळ मलेरियावरील औषध आहे. मलेरियाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी या गोळया दिल्या जातात. पण सध्या कोरोना व्हायरसवरील उपचारात हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यामुळे जगभरातून या गोळ्यांची मागणी वाढली आहे.