Mumbai Crime News: मुलीला जन्म दिल्याने नाराज पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले; ऑटो-रिक्षा चालकाने वाचवला पीडितेचा जीव
त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांनी, जेव्हा सरिताने एका मुलीला जन्म दिला तेव्हा संजयला मुलगा हवा होता म्हणून तो नाराज होता. गेल्या काही वर्षांत सरिताला आणखी तीन मुली झाल्या, त्यामुळे संजयला राग आला.
Mumbai Crime News: चुनाभट्टी (Chunabhatti) येथील सुमन नगर बसस्थानकाजवळ बुधवारी सकाळी एका 33 वर्षीय महिलेला तिच्या पतीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरिता ठाकूर असं या महिलेचं नाव आहे. यात सरिता 10% भाजली असून, ती सध्या सायन रुग्णालयात उपचार घेत आहे. सरिताचा भाऊ अमर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिताने 13 वर्षांपूर्वी 37 वर्षीय पती संजय रमाकांत ठाकूरसोबत लग्न केले होते. त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांनी, जेव्हा सरिताने एका मुलीला जन्म दिला तेव्हा संजयला मुलगा हवा होता म्हणून तो नाराज होता. गेल्या काही वर्षांत सरिताला आणखी तीन मुली झाल्या, त्यामुळे संजयला राग आला.
अमरने पुढे सांगितलं की, संजयने दारू पिण्यास सुरुवात केली आणि मुलाला जन्म देऊ नये म्हणून सरिताचा मानसिक व शारीरिक अत्याचार केला. सरिताने पतीविरुद्ध आरसीएफ आणि वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा - Mumbai Crime: मुंबई येथून एमडी ड्रग्जसह एका 25 वर्षीय तस्कराला अटक, 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त)
त्यानंतर तिने आपल्या चार मुलींसह वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. संजय वारंवार सरिताच्या घरी यायचा आणि तिला घरी परत ये नाहीतर तिच्यावर हल्ला करेल अशी धमकी देत असे. घटनेच्या दिवशी ती कामावर जात असताना तो तिच्या मागे गेला आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याने तिला लायटरच्या सहाय्याने पेटवून दिले.
दरम्यान, तेथून जाणाऱ्या इस्माईल शेख नावाच्या ऑटोचालकाने तिच्यावर पाण्याची बाटली ओतली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पीडितेच्या पती विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 504 (शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान), 506 (गुन्हेगारी धमकी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.